Join us
Daily Top 2Weekly Top 5

Satish Kaushik funeral : सतीश कौशिक यांच्या अंत्यदर्शनासाठी सेलिब्रिटींची गर्दी, कुटुंबीयांचं केलं सांत्वन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2023 18:31 IST

1 / 11
बॉलिवूडमधील प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आणि अभिनेते सतीश कौशिक यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. ते ६६ वर्षांचे होते.
2 / 11
हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना दिल्लीतील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
3 / 11
सतीश कौशिक यांच्या मृत्यूनंतर मनोरंजनविश्वात शोककळा पसरली आहे. बॉलिवूड कलाकारांनी त्यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर शोक व्यक्त केला आहे.
4 / 11
अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी सतीश यांच्या वर्सोवा येथील निवासस्थानी पोहोचले आहेत. अनुपम खेर, जावेद अख्तर बोनी कपूर, फरहान अख्तर, इशान खट्टर, जॉनी लिव्हर, अर्जुन कपूर असे अनेक सेलिब्रिटी अंत्ययात्रेत सहभागी होणार आहेत.
5 / 11
कौशिक यांच्या शवविच्छेदनाच्या अहवालातही हृदयविकाराचा झटक्यानेच त्यांचा मृत्यू झाल्याचं नमूद केलं आहे. कौशिक यांच्या मृतदेहावर कोणत्याही खुणा आढळलेल्या नाहीत.
6 / 11
सतीश कौशिक यांच्या मृतदेहावर काही क्षणात मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. पार्थिव दिल्लीहून मुंबईला पोहोचलं आहे.
7 / 11
मुंबईतील वर्सोवा येथील त्यांच्या निवासस्थानी कौशिक यांचं पार्थिव दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. अनेक सेलिब्रिटी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी पोहोचत आहेत.
8 / 11
वर्सोवा येथील स्मशान भूमीमध्ये सतीश यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. त्याचपूर्वी मुंबई येथे बॉलिवूड सेलिब्रिटी सतीश यांना शेवटचा निरोप देण्यासाठी गर्दी करत आहेत.
9 / 11
सतीश कौशिक यांच्यामागे त्यांची पत्नी व १० वर्षांची मुलगी असा परिवार आहे. सतीश यांच्या पत्नी शशी या सोशल मीडियावर सक्रिय नाहीत. त्या एक निर्मात्या आहेत.
10 / 11
१६ वर्षांनी २०१२मध्ये सरोगसीच्या मदतीने सतीश व शशी यांना मुलगी झाली. वयाच्या ५६व्या वर्षी सतीश पुन्हा वडील झाले. त्यांच्या मुलीचं नाव वंशिका असं आहे.
11 / 11
वंशिका आता १० वर्षांची आहे. सतीश त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे मुलगी व पत्नीबरोबरचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करायचे. सतीश यांच्या निधनानंतर त्यांचा मुलीबरोबर डान्स करतानाचाही व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
टॅग्स :सतीश कौशिकबॉलिवूडअनुपम खेरजावेद अख्तरअर्जुन कपूर