Samantha Ruth Prabhu: या गंभीर आजाराशी झुंज देतेय समंथा, हॉस्पिटलमधला फोटो शेअर करत म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2022 18:13 IST
1 / 10दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) सध्या तिच्या यशोदा चित्रपटामुळे चर्चेत आहे. मात्र, यादरम्यान चित्रपटसृष्टीसाठी आणि अभिनेत्रीच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. (फोटो इन्स्टाग्राम)2 / 10 समांथाने नुकतीच तिच्या तब्येतीबद्दल एक मोठी अपटेड दिली आहे. अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडियावर एक फोटो शेअर करून ती एका गंभीर आजाराशी झुंज देत असल्याचे सांगितले. (फोटो इन्स्टाग्राम)3 / 10हॉस्पिटलमधील एक फोटो शेअर करत अभिनेत्रीने याबाबत माहिती दिली आहे. (फोटो इन्स्टाग्राम)4 / 10 समांथाने सांगितले की तिला मायोसायटिस (Myositis)नावाच्या आजाराने ग्रासले आहे. (फोटो इन्स्टाग्राम)5 / 10समंथाने हॉस्पिटलमधील एक फोटो शेअर केला आहे. यासोबत त्याने एक लांबलचक पोस्ट लिहिली आहे. अभिनेत्रीने लिहिले की, 'यशोधाच्या ट्रेलरवर तुमची प्रतिक्रिया जबरदस्त होती. (फोटो इन्स्टाग्राम)6 / 10तुम्हा सर्वांचं माझ्यावर असलेले हे प्रेम मला माझ्या आयुष्यात येणाऱ्या आव्हानांना तोंड देण्याचे बळ देते.(फोटो इन्स्टाग्राम)7 / 10 काही महिन्यांपूर्वी मला मायोसायटिस असल्याचं निदान झाले. त्यातून बरे झाल्यानंतर मला याबद्दल बोलायचे होते परंतु याला अपेक्षेपेक्षा थोडा जास्त वेळ लागणार आहे. (फोटो इन्स्टाग्राम)8 / 10मी यातून लवकरच पूर्ण बरा होईन असा विश्वास डॉक्टरांना आहे. मी काही चांगले दिवस आणि काही वाईट दिवस पाहिले. मी तुमच्यावर प्रेम करते.. ही वेळ सुद्धा निघून जाईल.'(फोटो इन्स्टाग्राम)9 / 10समंथाच्या मित्रांनी आणि चाहत्यांनी तिला लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)10 / 10 अभिनेत्री श्रिया सरन, राशी खन्ना, नंदू रेड्डी, सुष्मिता कोनिडेला आणि इतरांनी तिच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली. त्याचबरोबर अभिनेत्रीच्या हजारो चाहत्यांनीही कमेंट करून तिला धीर दिला आहे.(फोटो इन्स्टाग्राम)