Join us
Daily Top 2Weekly Top 5

Samantha Ruth Prabhuने नागा चैतन्यसोबतच्या घटस्फोटानंतर खरेदी केलं त्याचं जुनं घर तेही दुप्पट किमतीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2022 10:44 IST

1 / 9
Samantha Prabhu Buy House in Hyderabad: साऊथची अभिनेत्री सामंथा रूथ प्रभु (Samantha Ruth Prabhu) घटस्फोटानंतर आता करिअरवर फोकस करत आहे. सामंथाचे अनेक मोठे प्रोजेक्ट्स पाइपलाईनमध्ये आहेत.( फोटो इन्स्टाग्राम)
2 / 9
अलीकडेच एक बातमी समोर आली आहे की समंथा प्रभूने तिचा एक्स पती नागा चैतन्य(Naga Chaitanya) याचे हैदराबादमधले जुने घर विकत घेतले आहे, यासाठी अभिनेत्रीने दुप्पट किंमत मोजली आहे. ( फोटो इन्स्टाग्राम)
3 / 9
2021 समंथा प्रभू आणि अभिनेता नागा चैतन्य यांनी मध्ये सोशल मीडियावर घटस्फोटाची घोषणा केली होती. (फोटो इन्स्टाग्राम)
4 / 9
तेव्हापासून या दोन्ही कलाकारांचे मार्ग कायमचे वेगळे झाले आहेत. पण नागा चैतन्यने हैदराबादमध्ये हे घर खरेदी करताच समंथा प्रभू आणि चैतन्य यांच्या नावाची चर्चा पुन्हा एकदा जोरात आली आहे.
5 / 9
खरं तर, समंथा प्रभूने विकत घेतलेल्या घरात ती आधी नागा चैतन्यसोबत राहत होती, पण घटस्फोटानंतर हे घर दोघांच्या संमतीने विकले गेले. त्यानंतर आता समंथा प्रभूने दुप्पट किंमत मोजून हे आलिशान घर विकत घेतले आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
6 / 9
नागा आणि समंथाने काही वर्ष एकमेकांना डेट केल्यावर 2017 साली लग्न केलं होतं. गोव्यात थाटामाटात हे लग्न पार पडलं होतं. (फोटो इन्स्टाग्राम)
7 / 9
जेवढी लग्नाची चर्चा झाली, तेवढीच त्यांच्या हनीमूनचीही चर्चा झाली होती. दोघेही तब्बल 40 दिवस हनीमूनला गेले होते. (फोटो इन्स्टाग्राम)
8 / 9
40 दिवस जगातील वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देत त्यांनी हनीमून एन्जॉय केलं होतं. चार वर्ष दोघांचाही सुखात संसार सुरू होता. पण गेल्या वर्षभरात दोघांमधील मतभेद वाढले होते. याचीच परिणीती अखेर घटस्फोटात झाली.(फोटो इन्स्टाग्राम)
9 / 9
समंथाच्या आगामी प्रोजेक्ट्सबाबत सांगायचं तर ती 'शकुंतलम' आणि 'यशोदा' सारख्या सिनेमात दिसणार आहे. 'पुष्पा' सिनेमातील आयटम नंबरने समंथाला जगभरातून प्रेम मिळालं. आता तिच्याकडे मोठमोठ्या ऑफर आहेत.(फोटो इन्स्टाग्राम)
टॅग्स :समांथा अक्कीनेनीTollywood