Join us

'सैराट'मध्ये साधीभोळी दिसणारी आर्चीची आई खऱ्या आयुष्यात आहे खूपच स्टायलिश, पाहा अभिनेत्रीचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2022 10:38 IST

1 / 8
नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट चित्रपट (Sairat Movie) २०१६ साली रिलीज झाला. या चित्रपटाने त्यावेळी बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली होती. या चित्रपटात परशा आणि आर्ची यांच्यासोबतच इतर कलाकारांच्या भूमिकाही लक्षवेधी ठरल्या. याच कलाकारांपैकी एक म्हणजे आर्चीच्या आईची भूमिका.
2 / 8
सैराटमध्ये आर्चीच्या आईची भूमिका भक्ती चव्हाण (Bhakti Chavan) या अभिनेत्रीने साकारली होती.
3 / 8
अभिनेत्री भक्ती चव्हाण खऱ्या आयुष्यात खूपच ग्लॅमरस असून सोशल मीडियावरील तिचे फोटो चर्चेत येत असतात. तिचा हा ग्लॅमरस अंदाज चाहत्यांना खूपच भावतो.
4 / 8
भक्ती चव्हाणचे सोशल मीडियावरील ग्लॅमरस फोटो चर्चेत येत असते.
5 / 8
भक्ती चव्हाणने सैराट नंतर आणखी काही मराठी चित्रपटात काम केले आहे. सैराट चित्रपटानंतर कधीच मागे वळून पाहिले नाही.
6 / 8
'एक मराठा लाख मराठा','तुला पण बाशिंग बांधायचय','कॉपी,वंटास' या सिनेमातही भक्ती चव्हाण यांनी भूमिका साकारली आहे.
7 / 8
याशिवाय तिने तू माझा सांगाती, घेतला वसा टाकू नको या मालिकेतही काम केले आहे.
8 / 8
भक्ती चव्हाणने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. तिला सैराट चित्रपटातून खूप लोकप्रियता मिळाली.
टॅग्स :सैराट 2