1 / 7सचिन यांनी खऱ्या आयुष्यात सुप्रिया यांच्याशी लग्न केलं असलं तरीही सुप्रियाआधी ते बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रीच्या प्रेमात होते. ही अभिनेत्री सारिका. 2 / 7सचिन हे तेव्हा १८ वर्षांचे होते. 'गीता गाता चल' या सिनेमाच्या सेटवर सचिन-सारिका यांची पहिली भेट झाली. याच सिनेमाच्या सेटवर दोघांची मैत्री वाढली आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.3 / 7सारिका या मुळच्या मराठीत आहेत. त्यांच्या वडिलांचं आडनाव सावंत. परंतु त्यांच्या आई-वडिलांचं नातं टिकलं नाही म्हणून त्यांची आई सारिकाच्या लहानपणीच तिला घेऊन वेगळं राहू लागली4 / 7सारिका-सचिनची जोडी सुपरहिट ठरत होती. दोघांनी आठ-नऊ सिनेमांमध्ये एकत्र काम केलं. परंतु सारिका-सचिनचं नातं सारिकाच्या आईला मान्य नव्हतं. 5 / 7सचिनसोबतच्या रिलेशनशीपमुळे लेकीच्या करिअरवर परिणाम होईल, अशी सारिकाच्या आईला भीती होती. त्यामुळेच सारिका आणि सचिन यांच्या नात्यात दुरावा आला. 6 / 7पुढे सारिकाने कमल हासन यांच्याशी लग्न केलं. सचिन यांचंही वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्य वेगळं झालं पण सारिका-सचिन दोघांनी मैत्री कायम जपली.7 / 7सचिन यांनी त्यांच्या आत्मचरित्रात या गोष्टीचा उल्लेख केलाय. यासाठी त्यांनी सारिकाची परवानगी घेतली होती. an affair to remember, असा खास उल्लेख त्यांनी केलाय