Join us  

बादशाह नाही तर 'हे' आहे प्रसिद्ध रॅपरचं खरं नाव; तुम्हाला माहितीये का?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2023 4:09 PM

1 / 9
बादशाह हे नाव सध्याच्या घडीला कोणासाठीही नवीन नाही. संगीत विश्वात बादशाह हे नाव चांगलंच लोकप्रिय ठरलं आहे.
2 / 9
आजवरच्या कारकिर्दीत बादशाहने अनेक भन्नाट गाणी कलाविश्वाला दिली आहेत.
3 / 9
आपल्या भन्नाट रॅपमुळे कायम चर्चेत येणाऱ्या बादशाहचे आज जगभरात चाहते असल्याचं पाहायला मिळतं.
4 / 9
बादशाहने हिंदीसह पंजाबी कलाविश्वातही अनेक हिट गाणी दिली आहेत.
5 / 9
सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या बादशाहविषयी प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. त्यामुळे त्यांना शक्य होईल त्या पद्धतीने ते त्याच्याविषयीची माहिती जाणून घेत असतात.
6 / 9
बादशाहच्या करिअरविषयी, त्याच्या प्रोफेशनल लाइफविषयी तर साऱ्यांनाच ठावूक आहे. मात्र, पर्सनल आयुष्याविषयी फारसं कोणाला माहित नाही.
7 / 9
आज जगभरात हा रॅपर बादशाह याच नावाने ओळखला जातो. परंतु, त्याचं खरं नाव काही वेगळंच आहे.
8 / 9
बादशाहचं खरं नाव आदित्य प्रतिक सिंग सिसोदिया असं आहे. परंतु, त्याचं हे नाव फारसं कोणाला माहित नाही.
9 / 9
कलाविश्वात आल्यानंतर आदित्य प्रतिक सिंग सिसोदिया याने त्याचं नाव बदलून बादशाह असं केलं.
टॅग्स :बादशहाबॉलिवूडसेलिब्रिटी