शेवंताचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन; अपूर्वाचा बदललेला लूक पाहून चाहते थक्क
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2024 14:47 IST
1 / 8मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे अपूर्वा नेमळेकर. रात्रीस खेळ चाले या मालिकेमुळे अपूर्वा पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली.2 / 8सध्या अपूर्वा प्रेमाची गोष्ट या मालिकेत ग्रे शेड भूमिका साकारत आहे. यापूर्वी ती बिग बॉस मराठीमध्ये झळकली होती.3 / 8दमदार अभिनय आणि सौंदर्य यांच्या जोरावर अपूर्वा अल्पावधीत लोकप्रिय झाली.4 / 8सध्या अपूर्वा तिच्या मालिकेमुळे वा सौंदर्यामुळे नाही तर तिच्या फिटनेसमुळे चर्चेत येत आहे.5 / 8अपूर्वाने इन्स्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत. यात तिचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन झाल्याचं दिसून येत आहे.6 / 8अपूर्वाने तिचे जीममधील फोटो शेअर केले असून यात ती कमालीची फीट दिसत आहे.7 / 8अपूर्वाचे फोटो पाहून अनेकांनी तिला वजन कमी केलंस का?, बारीक दिसतीये वगैरे अशा कितीतरी कमेंट केल्या आहेत.8 / 8सध्या अपूर्वा प्रेमाची गोष्ट या मालिकेत सावनी ही भूमिका साकारत आहे. या मालिकेत ती बरीच ग्लॅमरस दाखवण्यात आली आहे. त्यामुळे कदाचित मालिकेसाठी अपूर्वाने वजन घटवल्याचं म्हटलं जात आहे.