रश्मी देसाई दुसरं लग्न करतेय? म्हणाली, "अनेकदा चुकीचा नंबर लावल्यानंतर..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 13:08 IST
1 / 7अभिनेत्री रश्मी देसाई 'उतरन' मालिकेतून घराघरात पोहोचली होती. तिच्या 'तपस्या' या भूमिकेने तिला खूप लोकप्रियता दिली.2 / 7दिसायला गोड, गोबऱ्या गालाची रश्मी अल्पावधीच प्रेक्षकांची लाडकी झाली. मालिकेतील तिचा सहकलाकार अभिनेता नंदीशच्याच ती प्रेमात पडली.3 / 7२०११ मध्ये नंदीश आणि रश्मी देसाईने लग्न केलं. मात्र लग्नानंतर त्यांच्यात खटके उडाले. ५ वर्षांनी २०१५ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर अद्याप रश्मीने दुसरं लग्न केलेलं नाही. 4 / 7रश्मी आता ३८ वर्षांची असून दुसऱ्या लग्नाबाबत तिने नुकतेच विचार मांडले आहेत. नुकतंच एका मुलाखतीत रश्मी म्हणाली, 'मला प्रेमाबाबतीत तर माहित नाही पण मी अनेकदा चुकीचा नंबर डायल केला आहे. मला वाटतं देवाने माझ्यासाठी मुलगा निवडलेलाच नाही. कदाचित देवाला हे लक्षातच नाही.'5 / 7'माझ्या घरचे आता माझ्यासाठी स्थळ शोधत आहेत. चांगला मुलगा मिळाला तर मी लग्न करु शकते. पण सध्या काही घाई नाही.' याशिवाय रश्मीने कसा मुलगा हवा याचाही खुलासा केला.6 / 7ती म्हणाली, 'मला असा मुलगा हवा जो अगदी स्पष्ट बोलणारा असेल. जो प्रत्येक गोष्टीबाबतीत अगदी क्लिअर असेल गोंधळलेला नसेल असाच मुलगा हवा.'7 / 7रश्मी देसाई नुकतीच आर माधवनच्या 'हिसाब बराबर' सिनेमात दिसली. यासोबत ती गुजराती सिनेमांमध्येही काम करत आहे.