PHOTOS: बॉलिवूडच्या 'बाजीराव-मस्तानी'चा नव्या घरात गृहप्रवेश! तुम्ही पाहिलेत का Photos?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2022 10:47 IST
1 / 8 बॉलिवूड स्टार्स रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण यांनी अलीकडेच अलिबागमध्ये एक अतिशय आलिशान घर विकत घेतले आहे. मीडिया रिपोर्ट्समध्ये रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोणच्या या महागड्या प्रॉपर्टीची बरीच चर्चा झाली होती. हे घर सुपरस्टार शाहरुख खानच्या मन्नतजवळ आहे. दरम्यान आता या स्टार कपलने त्यांच्या अलीबागमधील नव्या घरात गृहप्रवेश केला आहे. रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण यांनी जन्माष्टमीच्या दिवशी त्यांच्या नवीन घरात पूजा केली. पाहा फोटो.2 / 8 रणवीर सिंगने पूजा दरम्यानचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आणि चाहत्यांना त्याच्या नवीन घरात गृहप्रवेश केल्याचं सांगितलं आहे.(फोटो इन्स्टाग्राम)3 / 8दीपिका आणि रणवीरचं हे घर १७ हजार ४५० चाै. फुटांचे विस्तीर्ण जागेत पसरलेलं आहे.(फोटो इन्स्टाग्राम)4 / 8या बंगल्यासाठी त्यांनी २२ कोटी रुपये मोजले आहेत. इतकंच नाही तर केवळ स्टॅम्प ड्युटीसाठी त्यांना तब्बल १.३२ कोटी रुपये खर्च करावे लागले आहेत.(फोटो इन्स्टाग्राम)5 / 8मापगाव येथे दीपिका-रणवीरने खरेदी केलेला बंगला प्रशस्त असून त्यात ५ बेडरुम्स आहेत.(फोटो इन्स्टाग्राम)6 / 8(फोटो इन्स्टाग्राम)7 / 8(फोटो इन्स्टाग्राम)8 / 8(फोटो इन्स्टाग्राम)