By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2022 20:55 IST
1 / 9बॉलिवूडमधील स्टार कलाकार रणवीर सिंग यानं केलेल्या न्यूड फोटोशूटमुळे खळबळ उडाली आहे. तसेच या प्रकरणात रणवीरविरोधात गुन्हाही दाखल झाला आहे. मात्र अशा प्रकारचं फोटोशूट करणारा रणवीर सिंह हा काही पहिला अभिनेता नाही. ९० च्या दशकातील काही कलाकारांनी केलेले फोटोशूट पाहून तुम्ही रणवीर सिंग परवडला, असं तुम्ही म्हणाल. 2 / 9रणवीर सिंगचं हे न्यूड फोटोशूट सध्या चर्चेत आहे. तसेच या फोटोशूटसाठी त्याला ट्रोल केल जात आहे. तसेच तो कायदेशीर अडचणीत अडकण्याचीही चिन्हे दिसत आहे. 3 / 9रणवीर सिंगने केलेलं फोटोशूट हे ९०च्या दशकातील काही सुपरस्टार्सनी केलेले काही फोटोशूट पाहिले तर तुम्हाला हसू आवरणार नाही. पाहूयात या फोटोशूटमधील काही चित्रविचित्र फोटो. 4 / 9९० च्या दशकामध्ये अनेक अभिनेत्यांनी अशी चित्रविचित्र फोटोशूट केली आहे. त्यातील फोटो पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसू शकतो. शक्ती कपूरचा हा फोटो खूप चर्चेत राहिला होता. 5 / 9९०च्या दशकातील सुपरस्टार गोविंदा आणि जुही चावला यांनी हे फोटोशूट केलं होतं. त्यामध्ये दोघांनी आपल्या शरीरावर चमचमता रॅपिंग पेपर लपेटला होता. 6 / 9अक्षय खन्ना आणि करिश्मा कपूरचा हा फोटो त्या काळाच खूप चर्चेत राहिला होता. या फोटोमधील दोन्ही स्टार्सनी दिलेली पोझ ही खूप विचित्र होती. 7 / 9अभिनेत्री पूजा भट्ट हिचं हे विचित्र फोटोशूट कुणीही विसरू शकणार नाही. आपल्या चहुबाजूला मस्क्युलर अभिनेत्यांसह पोझ देताना हा स्टारडम मॅगझिनसाठी त्यांनी हे फोटोशूट केले होते. ते खूप चर्चेत आले होते. 8 / 9शाहरुख खानने कधीकाळी एका मॅगझिनसाठी हे फोटोशूट केले होते. हे फोटोशूट आणि गमतीदार होते. या फोटोमध्ये शाहरुख खानचं बेबी बम्प पाहून प्रत्येकजण चकीत झाला होता. 9 / 9एकीकडे जिथे आज रणवीर सिंह याच्या न्यूड फोटोशूटवर वाद निर्माण झाला आहे. मात्र आदित्य पंचोली याने खूप आधी असं फोटोशूट केलं होतं.