Join us
Daily Top 2Weekly Top 5

कमी उंची, सावळा रंग अन् घोगरा आवाज, अभिनेत्रीला खूप हिणवलं गेलं; आज आहे कोट्यवधींची मालकीण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2024 16:28 IST

1 / 7
मनोरंजनसृष्टी म्हटलं की अभिनेत्रींना त्यांच्या लूक्सवर जास्त लक्ष द्यावं लागतं. वजन वाढलेलंही चालत नाही. तसंच अनेकदा त्यांना सावळ्या रंगावरूनही हिणवलं जातं.
2 / 7
अशीच एक अभिनेत्री जी आज कोटींची मालकीण आहे तिला कधीकाळी रंगावरुनच नाही तर तिच्या घोगऱ्या आवाजामुळेही रिजेक्शन मिळालं. कोण आहे ती अभिनेत्री?
3 / 7
ती अभिनेत्री आहे यशराज फिल्म्सची मालकीण, आदित्य चोप्राची पत्नी अभिनेत्री राणी मुखर्जी (Rani Mukerji). राणीला आज बॉलिवूडची राणी असली तरी सुरुवातीच्या काळात तिला काय ऐकून घ्यावं लागलं होतं याचा खुलासा नुकताच तिने केला.
4 / 7
बॉलिवूड बबलला दिलेल्या मुलाखतीत राणी म्हणाली, 'माझ्या करिअरच्या सुरुवातीला मला हिरोईन मटेरियल समजलं जात नव्हतं. यामुळे अनेक सिनेमे माझ्या हातातून गेले.'
5 / 7
'माझी उंची कमी आहे, रंग सावळा आहे आणि आवाजही अगदीच वेगळा आहे. या गोष्टी हिरोईन फ्रेंडली नाहीत. मी कधी सिल्व्हर स्क्रीनवर येईल आणि पडद्यावर काम करेन असं मला कधीच वाटलं नव्हतं.'
6 / 7
'पण जेव्हा देवानेच तुमच्यासाठी काही ठरवलेलं असतं तेव्हा तुम्ही या सगळ्या धारणा मोडता. या गोष्टी अजिबातच महत्वाच्या वाटत नाही. मला माझ्या आईने सर्वात आधी ही जाणीव करुन दिली की सुद्धा काही करु शकते. माझ्यापेक्षा जास्त तिलाच हा विश्वास होता '
7 / 7
राणी मुखर्जीने 'राजा की आएगी बारात' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. नंतर तिने कुछ कुछ होता है, गुलाम, कभी अलविदा ना कहना, मर्दानी आणि नुकताच रिलीज झालेला मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे असे एकापेक्षा एक सिनेमे दिले.
टॅग्स :राणी मुखर्जीबॉलिवूड