priyanka chopra & nick jonas: १३ व्या वर्षी पहिलं अफेअर, एक-दोन नाहीत तर तब्बल एवढ्या गर्लफ्रेंड्स, अशी आहे प्रियंका चोप्राचा पती निक जोनासची लव्ह लाईफ
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2021 21:40 IST
1 / 11प्रियंका चोप्रा आणि तिचा पती निक जोनास यांच्यातील घटस्फोटाच्या अफवांनी खळबळ उडवली आहे. दरम्यान, या दोघांनीही, तसेच प्रियंकाच्या आईने या अफवा असल्याचे सांगत या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, प्रियंका चोप्राच्या विवाहाआधीच्या अफेअर्सबाबत चाहत्यांना माहिती असले तरी तिचा पती निक जोनासच्या लव्ह लाईफबाबत फारच कमी माहिती आहे. दरम्यान, निक जोनासच्या अफेअर्सची लिस्टही मोठी आहे. जाणून घेऊयात निकच्या आतापर्यंतच्या गर्लफ्रेंड्सबाबत. 2 / 11निक जोनास आणि Miley Cyrus यांनी २००६ मध्ये एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली होती. त्यावेळी दोघांचे वय केवळ १३ वर्षे होते. एका चॅरिटी इव्हेंटमध्ये त्यांची ओळख झाली होती. मात्र त्यांचे प्रेम फार काळ टिकले नाही. २००७ मध्ये ते वेगळे झाले. 3 / 11मायलीसोबत ब्रेकअप झाल्यानंतर निक जोनासने सेलेना गोमेझला डेट केले. दोघेही २००८ पासून रिलेशनमध्ये होते. सेलेनाने एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये ही गोष्ट मान्य केली होती की, तिने १६ व्या वर्षी निकला डेट केले होते. 4 / 11सेलेनासोबत ब्रेकअप झाल्यानंतर निकच्या आयुष्यात ऑस्ट्रेलियन सिंगर Delta Goodrem आली ती त्याच्यापेक्षा आठ वर्षांनी मोठी होती. दोघांचे नाते १० महिने चालले. फेब्रुवारी २०१२ मध्ये ते वेगळे झाले. 5 / 11निकचे नाव त्याचा भाऊ जो जोनास याची माजी प्रेयसी Gigi Hadid हिच्यासोबतही जोडले गेले. दोघांना अनेक ठिकाणी एकत्र पाहिले गेले. दोघेही एकमेकांसोबत नात्यात होते. त्यानंतर गिगी हिने निकचा भाऊ जो यालाही डेट केले. 6 / 11२०१३ मध्ये निक जोनास याने Olivia Culpo हिच्यासोबत नाते जोडले. ओलिविया ही मिस युनिव्हर्स राहिली आहे. दोघांनी एकमेकांना दोन वर्षे डेट केले. मात्र अखेरीस २०१५ मध्ये त्यांचे ब्रेक अप झाले. 7 / 11त्यानंतर निकचे नाव मॉडेल Georgia Fowler हिच्याशीही जोडले गेले. दोघेही नात्यामध्ये गंभीर असल्याचे सांगण्यात येत होते. तसेत हे दोघेही निकचा भाऊ जो जोनास आणि सोफी टर्नर यांच्या एंगेजमेंट पार्टीमध्येही दिले होते. 8 / 11पुढे ब्रिटिश सिंगर आणि अभिनेत्री Rita Oraसोबत त्याच्या अफेरअरचे वृत्त आले होते. त्याच्या एका गाण्याचामध्येही तिचा उल्लेख होता. मात्र तिने निकसोबतच्या अफेअरचे वृत्त नाकारले होते. 9 / 11निक जोनासने २०१९ मध्ये Lily Collins सोबतच्या नात्याच्या खुलासा गेला होता. तसेच आम्ही काही वेळा एकत्र बाहेर गेलो होतो, असेही सांगितले. 10 / 11निक जोनासचे नाव अमेरिकन सोशलाईट केंडल जेनर हिच्यासोबतही जोडले गेले आहे. मात्र निक आणि केंडलने कधीही आपल्या नात्याबाबत स्पष्टपणे काही खुलासा केलेला नाही. मात्र दोघेही अनेकदा एकत्र दिसले होते. 11 / 11निक जोनासचे नाव त्याच्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले आहे. निकपेक्षा १३ वर्षांनी मोठी असलेल्या केट हडसन हिच्यासोबतही त्याचे नाव जोडले गेले होते. मात्र निकने या रिलेशनबाबत कधीही उघडपणे काही बोलणे टाळले होते.