प्रियांका-निकच्या बाळाच्या रुमचे फोटो व्हायरल, खोलीत आहे एका हिंदू देवाची लहाणपणीची मुर्ती
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2022 18:54 IST
1 / 10सरोगसीच्या माध्यमातून आपण आपल्या पहिल्या बाळाला जन्म देत आहोत हे प्रियंका चोप्रानं (Priyanka Chopra) सोशल मीडियावर पोस्ट केलं अनं तिच्यासोबतच तिचे सगळे चाहतेही त्या येणाऱ्या बाळाची एक झलक पाहण्यासाठी उत्सुक झाले. 2 / 10आतापर्यंत तिनं आपल्या मुलीचे फोटो जरी कुठे पोस्ट केले नसले तरी तिनं तिच्या आणि निक जोनस(Nick Jonas) च्या फोटोसोबत सोशल मीडियावर मुलीच्या खेळण्याच्या रुमचे काही फोटो पोस्ट केले आहेत,ज्यातनं एक मोठं सरप्राईज सर्वांना मिळालं आहे.3 / 10प्रियंका-निकच्या मुलीची अद्याप झलक दिसणार नसली तरी तिच्यासाठी सजवलेल्या खेळण्याच्या रुमची झलक मात्र डोळे दीपवून नक्की जाईल.4 / 10प्रियंका-नीकनं मुलीच्या जन्माची पोस्ट केल्यानंतर तब्बल दहा ते बारा दिवस सोशल मीडियापासून लांब राहणं पसंत केलं होतं.5 / 10तसं प्रियंकानं आपल्या चाहत्यांना प्रेमाचं आवाहनच केलं होतं की. म्हणाली होती,''आम्हाला आमचं नवं आयुष्य एन्जॉय करायचंय,थोडीसी प्रायव्हसी हवी आहे वगैरे,वगैरे...''6 / 10त्यानंतर हे दोघे पुन्हा सक्रिय झाले सोशल मीडियावर अन् छान-छान फोटो पोस्ट करू लागले. आता प्रियंकानं नीक सोबतचे काही फोटो शेअर करताना मध्येच काही सरप्राईजिंग फोटो शेअर केलेयत जे आहेत तिच्या मुलीच्या खेळण्याच्या रुमचे.7 / 10अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर एकूण सहा फोटो शेअर केले आहेत. यातील एका फोटोमध्ये बाळाची रूम दिसत आहे. अभिनेत्रीने फोटोला कॅप्शन देत 'फोटो डम्प'असं म्हटलं आहे.8 / 10प्रियांकाने फोटो शेअर करताच तिचे चाहते लाईक्स आणि कमेंट्सच्या रूपात प्रेमाचा वर्षाव करत आहेत.9 / 10खुप सारी खेळणी अशी छान मांडलेली त्या फोटोत दिसत आहे. तिथेच काही टेडीज मन आकर्षुन घेत आहेत. तर जवळच ठेवलेली बाळकृष्णाची सुंदर मुर्ती पाहून मन प्रसन्न होत आहे.10 / 10प्रियंकानं पोस्ट केलेले फोटो तिच्या चाहत्यांसाठी मात्र ''वॉव'' क्षण ठरेल एवढं मात्र नक्की.