By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 12:38 IST
1 / 8ग्लोबल स्टार प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) पती निक जोनास आणि मुलगी मालती मेरीसोबत अमेरिकेतच स्थायिक आहे. प्रियंका बॉलिवूडच नाही तर हॉलिवूडमध्येही सक्रीय आहे.2 / 8प्रियंका नेहमीच कुटुंबासोबत व्हॅकेशनचे फोटो शेअर करत असते. नुकतंच तिने न्यू इयर सेलिब्रेशनचे फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. 3 / 8प्रियंकाने समुद्रकिनारी न्यू इयर साजरा केला. यावेळी तिने निक जोनाससोबत बिकिनीत पोज दिली. लाल बिकिनी, लाल हॅट आणि गॉगल यामध्ये ती अगदी फॉरेनरच दिसत आहे. तर निक जोनास ब्लॅक कॅज्युअल आऊटफिटमध्ये स्मार्ट दिसतोय.4 / 8गुलाबी बिकिनीतही तिने एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये ती पाण्यात झोपलेली आहे. खूप सुंदररित्या हा फोटो क्लिक करण्यात आला आहे. 5 / 8मालती मेरीसोबतचाही गोड फोटो शेअर केला आहे. मालतीला जवळ घेऊन ती निककडे पाहत असतानाचा हा सुंदर फोटो आहे.6 / 8याशिवाय समुद्रात वॉटर स्पोर्ट्सचाही आनंद लुटतानाचा फोटो प्रियंकाने शेअर केला आहे. वॉटर जेटमध्ये बसून तिने पोज दिली आहे.7 / 8तर आणखी एका फोटोत ती व्हाईट शर्टमध्ये दिसत आहे. समोर समुद्राचा सुंदर नजारा आहे. मालती मेरीला मांडीवर घेऊन ती आरामात बसलेली आहे.8 / 8अशा प्रकारे प्रियंकाने टर्क्स अँड कैसास या नॉर्थ अमेरिकेतली एका प्रांतात यंदा नवीन वर्षाचं स्वागत केलं. तिच्या फोटोंना चाहत्यांनी खूप पसंती दिली आहे.