PHOTO: समृद्धी केळकरचा मराठमोळा थाट! दिवाळीनिमित्त केलं खास फोटोशूट
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2024 13:18 IST
1 / 7धनत्रयोदशीच्या दिवशी समृद्धीने हिरव्या रंगाची पैठणी साडी नेसून हटके अंदाजात फोटो क्लिक केले आहेत.2 / 7समृद्धी या फोटोंमध्ये खूपच सुंदर दिसते आहे. 3 / 7हिरवी नऊवारी साडी त्यावर साजेसे दागिने अशा पारंपरिक पेहरवात अभिनेत्री पाहायला मिळते आहे. 4 / 7समृद्धीचा हा खास मराठमोळा लूक नेटकऱ्यांच्या पसंतीस पडला असून फोटोला तिने दिलेल्या कॅप्शनने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.5 / 7'सण दिवाळीचा,आनंददायी क्षणांचा.नात्यातील आपुलकीचा, उत्सव हा दिव्यांचा.दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!' असं कॅप्शन देत अभिनेत्रीने तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.6 / 7फोटोंमध्ये समृद्धीने आकाश कंदीलसोबत तसेच हातात पणती घेऊन पोज दिल्या आहेत. 7 / 7इन्स्टाग्रामवर तिने हे फोटो शेअर केल्यानंतर त्यावर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.