Join us

अजय देवगणसोबत केलेली बॉलिवूड एन्ट्री, आज त्याच्या आईच्या भूमिकेची ऑफर? सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 17:36 IST

1 / 7
१९९१ साली आलेला 'फूल और काँटे' सिनेमा सर्वांना माहित असेलच. याच सिनेमातून अजय देवगणने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेलं. याशिवाय त्याची हिरोईन होती अभिनेत्री मधू.
2 / 7
अभिनेत्री मधूने 'फूल और काँटे' सिनेमानंतर अनेक बॉलिवूड आणि साउथ सिनेमांमध्ये अभिनय केलाय. मधूने एका मुलाखतीत एक खास खुलासा केला होता.
3 / 7
५० वर्षांच्या असणाऱ्या मधूला २० वर्षांच्या मुलीची भूमिका मिळणार नाही, याची जाणीव आहे. पण तरीही या वयात मनसारख्या भूमिका मिळत नसल्याने मधूने इंडस्ट्रीला रामराम ठोकला
4 / 7
मधूने एका मुलाखतीत खुलासा केला होता की, 'माझं वय जरी वाढलं असलं तरीही मी अजय देवगणच्या आईच्या भूमिकेची ऑफर स्वीकारु शकत नाही.'
5 / 7
'मी आणि अजयने एकत्र बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं असल्याने हे मी नाही करु शकत. अर्थात तरीही भूमिका आव्हानात्मक असेल तर मला करायला काहीच हरकत नाही', असं मधू म्हणाली होती.
6 / 7
मधू गेल्या काही वर्षांपासून मोजक्याच प्रोजेक्टमध्ये काम करताना दिसत आहे. मधूने काही महिन्यांपूर्वी समांथासोबत 'शांकुतलम' सिनेमात अभिनय केलेला
7 / 7
मधूने १९९१ साली आलेल्या 'फूल और काँटे' सिनेमातून बॉलिवूड पदार्पण केलं होतं. मधू आणि अजय देवगणचा हा सिनेमा चांगलाच गाजलेला.
टॅग्स :अजय देवगणबॉलिवूड