By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2025 13:30 IST
1 / 7अंकिता लोखंडे ही लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री आहे. पवित्र रिश्ता या मालिकेमुळे अंकिता घराघरात पोहोचली. त्यानंतर अनेक सिनेमांमध्येही ती दिसली. 2 / 7पण, अंकिताचा कलाविश्वातील हा प्रवास अजिबातच सोपा नव्हता. अंकिताला सुरुवातीच्या काळात कास्टिंग काऊचचा सामना करावा लागला होता. 3 / 7नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिने याबाबत खुलासा करत तो प्रसंग सांगितला. अंकिता म्हणाली, 'मी तेव्हा फक्त १९-२० वर्षांची असेन. पण मी स्मार्ट होते'. 4 / 7मी खोलीत एकटीच होते. मी त्यांना थेट विचारलं की तुमच्या निर्मात्याला नक्की कोणत्या प्रकारचं कॉम्प्रोमाइज हवं आहे. 5 / 7त्यांना मला कोणत्या पार्टीमध्ये घेऊन जायचं आहे की डिनरला सोबत जायचं आहे. मी त्यांना म्हणाले की मला वाटतं तुमच्या निर्मात्याला एका मुलीसोबत झोपायचं आहे. 6 / 7त्यांना एका टॅलेंटेड मुलीसोबत काम करण्याची इच्छा नाही. त्यानंतर त्यांनी माझी माफी मागितली. 7 / 7ते मला म्हणाले की मी प्रयत्न करेन की तुम्हाला या सिनेमात काम मिळेल. त्यानंतर मी त्यांना म्हणाले की मला काम करण्यात काही इंटरेस्ट नाही. त्यानंतर मी तिथून निघून गेले.