Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘बेशरम रंग’ गाण्यात दीपिकाची बिकिनी डिझाईन करणारी डिझायनरही कमी बोल्ड नाही! पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2022 16:28 IST

1 / 11
‘पठाण’ सिनेमातील ‘बेशरम रंग’ या गाण्यात दीपिका पादुकोणनं भगव्या रंगाची बिकिनी घातली अन् देशातील वातावरण तापलं. सध्या यावरून मोठा वाद सुरू आहे. काहींनी मात्र गाण्यातील दीपिकाचा सेन्शुअस लुक भलताच आवडला आहे.
2 / 11
दीपिकाचा हा मादक लुक कुणी डिझाईन केला हे तुम्हाला ठाऊक असेलच. तिचं नाव शालीन नथानी.‘बेशरम रंग’नंतर तिचंही नाव चर्चेत आलं आहे.
3 / 11
स्क्रिनवर दीपिकाला बोल्ड लुक देणारी सेलिब्रिटी स्टायलिस्ट शालीन नथानी स्वत:ही बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षा कमी नाहीये. ती सुद्धा भलतीच बोल्ड अन् ग्लॅमरस आहे.
4 / 11
शालीन नथानी तिच्या ग्लॅमरस लुकसाठी ओळखली जाते. तिची स्टाईल, तिचा अंदाज सुपर किलर आहे.
5 / 11
प्रत्येक आऊटफिस शालिन ग्रेसफुली कॅरी करते. सौंदर्याच्या बाबतीत ती बॉलिवूडच्या बड्या बड्या अभिनेत्रींना टक्कर देते.
6 / 11
सोशल मीडियावर शालीन प्रचंड लोकप्रिय आहे. इन्स्टाग्रामवर ती सेलिब्रिटींसोबत फोटो शेअर करत असते.
7 / 11
स्वत:चे अनेक बोल्ड, ग्लॅमरस फोटो तिने शेअर केले आहेत. तिनेच ‘बेशरम रंग’ गाण्यातील दीपिका आणि शाहरुखचे आऊटफिट डिझाईन केले आहेत.
8 / 11
सेलिब्रिटींना वेगळा लुक देण्यासाठी शालीन ओळखली जाते. ‘बेशरम रंग’ गाण्यातील दीपिकाचा लुक पाहून तुम्हाला तिच्या कामाची कल्पना आलीच असेल.
9 / 11
‘बेशरम रंग’ या गाण्यासाठी मला मनापासून काहीतरी वेगळे करायची इच्छा होतीच. दोन्ही स्टार्सचे आऊटफिट वेगळे असावे. ज्या पद्धतीने त्यांनी स्विमसूट घातले आहेत, रंगांचा वापर झाला आहे ते फारच युनिक वाटतं,असं अलीकडे शालीन म्हणाली होती.
10 / 11
‘पठाण’चे मेकर्स शालीनच्या कामावर फारच खुश असल्याचे दिसते. शालीनने यापूवीर्ही अनेकदा दीपिकासाठी आऊटफिट डिझाईन केले आहेत.
11 / 11
शालीनने बॉलिवुडमधील अनेक सिनेमांमध्ये कलाकारांना स्टाईल केलं आहे. ‘बेशरम रंग’ या गाण्यानंतर तिची बॉलिवुडमधील मागणी फारच वाढली आहे.
टॅग्स :दीपिका पादुकोणपठाण सिनेमाबॉलिवूड