By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2022 18:13 IST
1 / 9सुकेश चंद्रशेखरशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. या प्रकरणामुळे बॉलिवूडच्या दोन अभिनेत्री समोरासमोर आल्या आहेत.2 / 9२०० कोटी रुपयांच्या मनी लॉंडरिंगप्रकरणी आज दिल्ली पटियाला हाऊस कोर्टात अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसही कोर्टात पोहोचली होती. मात्र न्यायालयाने २० डिसेंबरपर्यंत सुनावणी पुढे ढकलली आहे. (फोटो इन्स्टाग्राम)3 / 9नोरा फतेहीने दिल्ली कोर्टात जॅकलिन फर्नांडिस आणि अनेक मीडिया कंपन्यांविरोधात मानहानीचा खटला दाखल केला आहे. (फोटो इन्स्टाग्राम)4 / 9महाठग सुकेश चंद्रशेखरशी संबंधित २०० कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तिचं नाव जबरदस्तीने रोवण्यात आल्याचा आरोप नोरा फतेहीने केला आहे. (फोटो इन्स्टाग्राम)5 / 9सुकेशशी तिचा थेट संपर्क नव्हता, असं नोराचं म्हणणं आहे. सुकेशची पत्नी लीना मारिया पॉल हिच्यामुळे ती सुकेशला ओळखत होती. (फोटो इन्स्टाग्राम)6 / 9नोराने सुकेश चंद्रशेखर यांच्याकडून भेटवस्तू घेण्यास नकार दिला आहे. मीडिया ट्रायलमुळे तिच्या प्रतिष्ठाला ठेच लागल्याचं नोराचं म्हणणं आहे. (फोटो इन्स्टाग्राम)7 / 9जॅकलिन फर्नांडिस आणि नोरा फतेही या दोघी मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीच्या निशाण्यावर आहेत. या प्रकरणाच्या तपासासाठी ईडीने दोन्ही अभिनेत्रींची अनेकदा चौकशी केली आहे. (फोटो इन्स्टाग्राम)8 / 9सुकेश चंद्रशेखरकडून महागड्या भेटवस्तू घेतल्याचाही आरोप नोरा फतेहीवर आहे. मात्र, नोराने प्रत्येक वेळी चौकशीदरम्यान हे आरोप चुकीचे असल्याचं म्हटलं आहेत. सुकेशने नोरा फतेहीचा मेहुणा बॉबीला ६५ लाखांची बीएमडब्ल्यू कार गिफ्ट केल्याचे सांगण्यात आले. (फोटो इन्स्टाग्राम)9 / 9तपासात सुकेशने निश्चितपणे बीएमडब्ल्यू कारची ऑफर दिल्याचे तपासात उघड झाले आहे. मात्र अभिनेत्रीने ही कार घेण्यास नकार दिला. नोराला सुरुवातीपासूनच या डिलबद्दल संशय होता. सुकेश सतत नोराला फोन करत होता. त्यानंतर नोराने सुकेशचा नंबर ब्लॉक केला.(फोटो इन्स्टाग्राम)