Indian Idol 13मधून गायब आहे नेहा कक्कर, शो सोडून ती सध्या काय करतेय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2022 12:06 IST
1 / 10छोट्या पडद्यावरील लोकप्रिय सिंगिग रिएलिटी शो इंडियन आयडॉल सीझन १३ला प्रेक्षकांचा चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे. सध्या या शोमधील एक परीक्षक गायब आहे.2 / 10ही परिक्षक दुसरी तिसरी कुणी नसून नेहा कक्कर आहे. ती शोमध्ये दिसत नसल्यामुळे त्याचे चाहते नाराज झाले आहेत. ती कुठे गायब झालीय, असा प्रश्न त्यांना पडला आहे. 3 / 10नेहा कक्कर सध्या इंडियन आयडॉलमध्ये दिसत नाहीये कारण ती म्युझिक कॉन्सर्टमध्ये व्यस्त आहे. 4 / 10 नेहाच्या इन्स्टा पोस्टवरून तिच्याबद्दलचे सर्व अपडेट्स घेता येतील.5 / 10नेहा कक्करने तीन दिवसांपूर्वी दुबईतील तिच्या कॉन्सर्टचा व्हिडिओ आणि फोटो शेअर केले होते. या फोटोंमध्ये नेहा कक्करची जबरदस्त स्टाईल पाहायला मिळाली.6 / 10 दुसरीकडे, कॉन्सर्टमध्ये नेहा कक्करच्या रॉकिंग परफॉर्मन्सवरही लोक थिरकताना दिसले.7 / 10नेहाने तिचा ख्रिसमस सेलिब्रेशनचा व्हिडिओही शेअर केला आहे. ज्यामध्ये नेहा फॅमिली आणि पती रोहनप्रीतसोबत सेलिब्रेशन करत आहे. 8 / 10आता नेहा पार्टी दुबईत करते की चंदीगडमध्ये, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. 9 / 10 इंडियन आयडॉलच्या मंचावरून नेहा भलेही अनुपस्थित असेल, पण सोशल मीडियावर ती चाहत्यांचे उत्तम मनोरंजन करत आहे. 10 / 10 नेहाच्या रीलचा व्हिडिओ चाहत्यांमध्ये व्हायरल होत आहे. त्याच्या कॉन्सर्टचे व्हिडिओ इन्स्टावर भरपूर आहेत. नववर्षानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या शोच्या सक्सेस पार्टीमध्ये ती दिसेल, अशी आशा नेहा कक्करच्या चाहत्यांना आहे.