By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2020 13:38 IST
1 / 10बॉलिवूड सिंगर नेहा कक्करने प्रेग्नंट असल्याची गुड न्यूज दिली आणि चाहत्यांना सुखद धक्का दिला. नेहाने सोशल मीडियावर तिच्या बेबी बम्बचा फोटो शेअर केला आणि यानंतर सर्वांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.2 / 10प्रेग्नंसी जाहीर केल्यानंतर काहीच तासांत नेहा कक्कर पती रोहनप्रीत सिंगसोबत मुंबई एअरपोर्टवर दिसली. यादरम्यान ती बेबी बम्प लपवताना दिसली.3 / 10 सकाळी सकाळी नेहा मुंबईच्या एअरपोर्टवर दिसली आणि तिचे फोटो क्लिक करण्यासाठी पापाराझींनी एकच गर्दी केली. यावेळी नेहाने बेबी बम्प लपवण्याचा प्रयत्न केला.4 / 10नेहाच्या चेहºयावर थकवा होता. पण चेह-यावर भलेमोठे स्माईल होते. यादरम्यान पर्सने ती सतत बेबी बम्प लपवण्याचा प्रयत्न करत होती.5 / 10नेहाने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला. सोबत कॅप्शन. हा फोटो आणि कॅप्शन पाहून नेहा प्रेग्ननंट आहे का अशी चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली.6 / 10 नेहाने या फोटोसोबत खयाल रख्या कर... (काळजी घेत जा...) असे लिहिले आहे तर रोहनप्रीतने अब तो कुछ ज्यादा ही ख्याल रखना पडेगा नेहू (आता तर खूपच जास्त काळजी घ्यावी लागणार नेहू) अशी कमेंट लिहिली आहे. त्यामुळे नेहाकडे गुड न्यूज आहे असे मानून अनेकांनी तिला शुभेच्छा दिल्या.7 / 10अर्थात नेहा खरंच गरोदर आहे की हा कोणता पब्लिसिटी स्टंट आहे अशी चर्चा देखील रंगली.8 / 10 गायिका नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंग यांचा गेल्या 24 आॅक्टोबरला मोठ्या दिमाखात विवाह संपन्न झाला. त्यांनी दिल्लीतील एका गुरूद्वारामध्ये सात फेरे घेतले.9 / 10रोहनप्रीत सिंगच्या घरी नवोदित वधू नेहा कक्करचे जंगी स्वागत करण्यात आले होते. त्यानंतर एक व्हिडीओ समोर आला होता ज्यात नेहा आणि रोहनप्रीत ढोलच्या तालावर थिरकताना दिसले होते.10 / 10सध्या नेहा ‘इंडियन आयडल 2020’ जज करतेय.