Join us

Natasa Stankovic : नताशासाठी सोपं नाही कमबॅक; हार्दिकशी लग्न केल्यावर सोडलेलं करियर, म्हणाली, "५ वर्षांनंतर..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 12:44 IST

1 / 11
नताशा स्टँकोविचला एक्टिंगमध्ये कमबॅक करायचं आहे. पण आता ते इतकं सोपं नाही हे तिने मान्य केलं आहे. नताशाने २०१४ मध्ये 'सत्याग्रह' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली.
2 / 11
नताशा बिग बॉस आणि नच बलिये सारख्या रिएलिटी शोमध्येही दिसली, पण नंतर ती क्रिकेटपटू हार्दिक पांड्याच्या प्रेमात पडली आणि तिने लग्न केलं. ती एका मुलाची आईही झाली.
3 / 11
नताशा आणि हार्दिकचं हे नातं तुटलं, त्यानंतर नताशा आता एक नवीन सुरुवात करू इच्छिते. TOI शी बोलताना ती म्हणाली की, '५ वर्षांनंतर हे सोपं नाही.'
4 / 11
'गोष्टी हळूहळू ठीक होत आहेत. लोकांना माहित नव्हतं की, मी काम करण्यास तयार आहे. मी लोकांना समजेल येईल इतका वेळ उपलब्ध नव्हते.'
5 / 11
'माझ्या घटस्फोटानंतर लोक म्हणू लागले की मी सर्बियाला परत गेले आहे, पण मी परत का जाऊ, माझा एक मुलगा आहे जो इथेच शाळेत जातो. हे कधीच होणार नाही.'
6 / 11
'मी आणि हार्दिक अजूनही एक कुटुंब आहोत. आम्ही आमच्या मुलाची काळजी एकत्र घेतो. अगस्त्य माझ्यासाठी सर्वकाही आहे. मी सर्वात आधी एक आई आहे आणि हे कधीही बदलणार नाही.'
7 / 11
'माझं मानसिक आरोग्य चांगलं नव्हतं असं नाही. पण मला खरोखर काम करण्याची गरज होती. मुलाच्या आनंदासाठी आईने आनंदी असणं महत्वाचं आहे असं मला वाटते.'
8 / 11
'मी कामावर परतण्याचा निर्णय घेण्यामागे हे एक कारण होतं. गेल्या पाच वर्षात मी काहीही केलं नाही याची मला खंत वाटते.'
9 / 11
'मला आयुष्यात कोणताही पश्चात्ताप नाही कारण मला एक मूल आहे आणि मी त्याला वेळ दिला आहे.'
10 / 11
'मी हे आधीच करू शकले असतो. एक महिला म्हणून आणि पूर्वी काम केलेली व्यक्ती म्हणून, माझ्या मानसिक आरोग्यासाठी काम करणं चांगलं झालं असतं' असं नताशाने म्हटलं आहे.
11 / 11
टॅग्स :नताशा स्टँकोव्हिचहार्दिक पांड्याबॉलिवूड