Join us  

हुबेहूब आपल्या वडिलांची कार्बन कॉपी आहे नाना पाटेकरांचा लेक; 'या' फिल्डमध्ये करतोय करिअर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2022 7:00 AM

1 / 11
उत्तम संवादफेक कौशल्य आणि अभिनयशैली यांच्या जोरावर गेल्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता म्हणजे नाना पाटेकर.
2 / 11
नाना पाटेकर उत्तम अभिनेता असण्यासोबतच एक लेखक आणि निर्मातेदेखील आहेत.
3 / 11
अनेक पुरस्कार नावावर करणारे नाना पाटेकर सोशल मीडियावर फारसे सक्रीय नाहीत. मात्र, त्यांच्याविषयी दररोज चाहत्यांमध्ये चर्चा रंगत असते.
4 / 11
सध्या सोशल मीडियावर नाना पाटेकरांच्या लेकाची चर्चा रंगली आहे.
5 / 11
कलाविश्वात सक्रीय असलेल्या नाना पाटेकर यांचे कुटुंबीय सोशल मीडियापासून वा कलाविश्वाच्या झगमगाटापासून शक्यतो दूर राहतात.
6 / 11
नानांचा मुलगा सोशल मीडियावर फारसा सक्रीय नसला तरीदेखील तो कलाविश्वात चांगलाच कार्यरत आहे.
7 / 11
नाना पाटेकर यांच्या लेकाचं नाव मल्हार पाटेकर असं आहे. मल्हार हुबेहूब नानांप्रमाणेच दिसतो.
8 / 11
मुंबईतील सरस्वती मंदिर हायस्कूलमधून मल्हारने त्याचं शालेय शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर वाणिज्य शाखेतून ग्रॅज्युएशन केलं.
9 / 11
मल्हारला लहानपणापासून कलाविश्वात काम करायची आवड आहे. त्यामुळे त्याने प्रकाश झासोबत काम करण्यास सुरुवात केली होती. मात्र, नाना आणि प्रकाश झा यांच्यात वाद झाल्यामुळे मल्हारला हा प्रोजेक्ट सोडावा लागला.
10 / 11
मल्हारने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून 'द अॅटक ऑफ 26/11'या चित्रपटासाठी दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांच्यासोबत काम केलं आहे.
11 / 11
सध्या मल्हारचं स्वत:चं प्रोडक्शन हाऊस आहे. मल्हारने या प्रोडक्शन हाऊसचं नाव नाना साहब प्रोडक्शन असं ठेवलं आहे.
टॅग्स :नाना पाटेकरबॉलिवूडसेलिब्रिटी