By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2024 12:10 IST
1 / 8'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोमधून प्रसिद्धीझोतात आलेली आणि प्रेक्षकांना खळखळवून हसवणारी अभिनेत्री नम्रता संभेराव हिचा आज वाढदिवस आहे. 2 / 8नम्रताचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. एवढंच काय तर अफलातून विनोदबुद्धी असलेल्या नम्रताचे बॉलिवूड अभिनेता बोमन इराणीही फॅन आहेत. अभिनेत्रीने बोमण इराणी यांच्याबरोबरचा एक किस्सा सांगितला होता. 3 / 8बोमन इराणी आणि नम्रताने व्हेंटिलेटर या सिनेमात एकत्र काम केलं होतं. या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान बोमन इराणींनी नम्रताच्या कामाचं कौतुक केलं होतं. तुझी ही भाषा कुठेतरी वापरणार असं ते तिला म्हणाले होते. 4 / 8बोमन इराणींनी नम्रताला तिचा फॅन असल्याचंही सांगितलं होतं. एकदा नम्रता सिनेमाचं शूटिंग संपल्यानंतर घरी जाण्यासाठी रिक्षाची वाट बघत रस्त्यावर थांबली होती. 5 / 8तेवढ्यात बोमन इराणी तिथे आले. नम्रताला पाहून बोमन इराणींनी त्यांची BMW कार थांबवत अभिनेत्रीची विचारपूस केली.6 / 8त्यांनी ड्रायव्हरला सांगून अभिनेत्रीचं सामान गाडीत ठेवायला सांगितलं. आणि नम्रताला पाठीमागे बसायला सांगितलं. 7 / 8नम्रताला काळाचौकीला जायचं होतं. तर त्यांना मध्येच दादरला उतरायचं होतं. त्यामुळे बोमन इराणींनी माफी मागितल्याचंही नम्रता म्हणाली होती. 8 / 8' त्यांच्या गाडीत बसल्यानंतर मी त्यांना म्हणाले होते की सर मी पहिल्यांदा BMW मध्ये बसले आहे. तर ते म्हणाले की मी पण कधीतरी पहिल्यांदा BMWमध्ये बसलो होतो. एक दिवस तू स्वत:च्या BMW मध्ये बसशील,' असं नम्रताने सांगितलं होतं.