Join us
Daily Top 2Weekly Top 5

शाहरुखने बंगल्याची नेमप्लेट का बदलली?, गौरीनं सांगितलं पॉझिटीव्ह कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2022 17:37 IST

1 / 10
बॉलीवूडचा 'बादशाह' अभिनेता शाहरुख खानचा 'मन्नत' बंगला नेहमीच चाहत्यांचं आकर्षण राहिला आहे. अगदी बॉलीवूड तारकांनाही 'मन्नत'चं खूप अप्रूप आहे. शाहरुखसोबत फोटो टिपता नाही आला तरी 'मन्नत' समोर फोटो टिपून आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी दररोज शेकडो फॅन्स त्याच्या बंगल्याबाहेर गर्दी करत असतात.
2 / 10
आता 'मन्नत'च्या सौंदर्यात आणखी एक भर पडली आहे. शाहरुखच्या 'मन्नत'ला नवी नेमप्लेट मिळाली आहे. गेटवर हिरेजडीत नेमप्लेट आता चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. नव्या नेमप्लेटचे फोटो देखील सोशल मीडियात व्हायरल होत आहेत.
3 / 10
शाहरुखच्या फॅन क्लबनं 'मन्नत'चे काही फोटो शेअर केले आहेत. बंगल्याच्या गेटवर नवी नेमप्लेट बसवण्यात आली आहे. यात डायमंड्स आणि लाइट्सचा वापर करुन आकर्षक पद्धतीनं 'मन्नत' नाव साकारण्यात आलं आहे.
4 / 10
रात्री लाइट्स चालू केल्यानंतर एलईडीच्या प्रकाशात आणि डायमंडच्या चकाकीनं 'मन्नत' नाव उजळून निघतं. याआधी मन्नत बंगल्याची नेमप्लेट साध्या एका लाकडी बोर्डची होती.
5 / 10
दोन महिन्यांपूर्वी मन्नतची नेमप्लेट काढण्यात आली.अखेर रविवारी 'मन्नत'ला नवी नेमप्लेट मिळाली आहे. फॅन्स आता या नेमप्लेट समोर उभं राहून सेल्फी टिपत आहेत.
6 / 10
शाहरुखची पत्नी गौरी खान हिनेही मन्नत बंगल्याबाहेर उभे राहून पोज दिली आहे. गौरीचा मन्नत बाहेरील फोटो इंस्टाग्रामवर अपलोड करण्यात आला असून नेटीझन्से भन्नाट कमेंट दिल्या आहेत.
7 / 10
व्हाईट टॉप विथ ब्लेझर आणि ब्लू जिन्स घातलेली गौरी नवीन नेमप्लेटला खांदा टेकून उभी आहे. डोळ्यावर गॉगल आणि कमरेवर हात ठेवून गौरीने नवीन नेमप्लेटसोबत फोटो घेतला आहे.
8 / 10
गौरीने इंस्टावर या फोटोसह कॅप्शनही दिले आहे. आपल्या घराचा मुख्य दरवाजा हे आपल्या मित्रांचे व कुटुंबीयांचे येण्याचे ठिकाण असते. त्यामुळे, नेमप्लेट पॉझिटीव्ह एनर्जीला आकर्षित करते.
9 / 10
या नेमप्लेटसाठी आम्ही ग्लास, क्रिस्टलसह एक पारदर्शी काच मटेरियलची निवड केली आहे. ज्याद्वारे एक सकारात्मक ऊर्जा, मन फ्रेश आणि शांत करणारी लहर येते. गौरी स्वत: एक इंटेरियर डिझाईनर आहे.
10 / 10
गौरीच्या नेमप्लेटमध्ये लागलेला हॅशटॅगवरुन ही नेमप्लेट स्वत: गौरीनेच डिझाईन केल्याचं स्पष्ट होत आहे. तसेच, या नेमप्लेटमध्ये कुठेही हिरे लावण्यात आले नसल्याचंही गौरीच्या कॅप्शनवरुन स्पष्ट होते.
टॅग्स :शाहरुख खानगौरी खानबॉलिवूडमुंबईइन्स्टाग्राम