Join us
Daily Top 2Weekly Top 5

माझ्या नवऱ्याची बायको! पहिल्यांदाच आमनेसामने आल्या शूरा आणि मलायका अरोरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2024 12:07 IST

1 / 10
मलायका अरोरा आणि अरबाज खान घटस्फोटानंतर आपापल्या आयुष्यात पुढे गेले आहेत. अरबाज खानने अलीकडेच सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट शूरा खानसोबत दुसरे लग्न केले. मलायका अरोरा बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरलाही डेट करत आहे. मात्र, मलायका आणि तिचा एक्स पती अरबाज यांच्यातील मैत्रीचे नाते कायम आहे.
2 / 10
शुक्रवारी रात्री मलायका अरोराने तिचा एक्स पती अरबाज खान आणि त्याची दुसरी पत्नी शूरा खानसोबत टाइम स्पेंड केला.
3 / 10
वास्तविक मलायका अरोरा तिच्या आईसोबत मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये डिनरसाठी आली होती. यावेळी तिचा एक्स पती अरबाज खान आणि त्याची दुसरी पत्नी देखील तिच्यासोबत डिनरसाठी सामील झाले होते.
4 / 10
यावेळी मलायका खूपच सुंदर दिसत होती. तिने मॅचिंग जॅकेट आणि शॉर्ट्ससह पांढऱ्या रंगाचा टॉप घातला होता. अभिनेत्रीने तिचे केस मोकळे सोडले होते आणि मेकअप केला होता.
5 / 10
मलायकाने हाय हिल्स आणि पर्स घालून तिचा लूक पूर्ण केला. मलायकाने या काळात पापाराझीसाठी बरेच फोटो क्लिक केले आहेत.
6 / 10
अरबाज खान पत्नी शूरा खानचा हात धरून डिनर डेटसाठी पोहोचला होता. यावेळी अरबाजने निळ्या रंगाचा डेनिम शर्ट आणि जीन्स घातली होती आणि तो खूपच हॅण्डसम दिसत होता. तर त्याची पत्नी शूरा खान हिने काळ्या रंगाचा आउटफिट परिधान केला होता. ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये शूरा खूपच ग्लॅमरस दिसत होती.
7 / 10
यावेळी मलायकाची आईदेखील सोबत होती.
8 / 10
अरबाज आणि शूराने एकमेकांचा हात धरून पॅप्ससाठी पोझ दिले. अरबाज आणि शूरा खानचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
9 / 10
मलायका, अरबाज आणि त्याची पत्नी शूरा खानसोबत सलीम खानही डिनरसाठी आले होते.
10 / 10
यावेळी सलीम खान डेनिम शॉर्ट्स आणि जीन्समध्ये दिसले. ते रेस्टॉरंटच्या बाहेर गाडीची वाट पाहत होते.
टॅग्स :अरबाज खानमलायका अरोरा