ही कोण तर साऊथची सुपरस्टार अन् विद्या बालनची बहीण, पाहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2020 08:00 IST
1 / 13विद्या बालन ही बॉलिवूडची गुणी अभिनेत्री. विद्या बालनला आपण सगळेच ओळखतो. बॉलिवूडच्या सर्वाधिक बोल्ड आणि सुंदर अभिनेत्रींत तिची गणना होते. पण केवळ विद्याच नाही तर तिची बहीणही तिच्याइतकीच हॉट आणि सुंदर अभिनेत्री आहे. 2 / 13विद्याच्या या बहिणीला फार कमी लोक जाणतात. पण ती साऊथची सुपरस्टार आहे. आम्ही बोलतोय, ते विद्या बालनची चुलत बहीण प्रियामणि हिच्याबद्दल.3 / 13प्रियामणी साऊथच्या बड्या स्टार्सपैकी एक आहे. तिच्या बोल्डनेससाठी ती ओळखली जाते. 4 / 13बॉलिवूडच्या एक-दोन चित्रपटांत प्रियामणि दिसली खरी. बॉलिवूडच्या काही आयटम साँगमध्येही ती दिसली. पण बॉलिवूडमध्ये ती फार काही खास करू शकली नाही.5 / 13प्रियामणिचे पूर्ण नाव प्रिया वासुदेव अय्यर आहे. शाळेच्या दिवसांतच तिने कांचीवरम सिल्क आणि इरोड सिल्कसाठी मॉडेलिंग केली होती.6 / 1312 वीत असतानाच तामिळ दिग्दर्शक भारतीराजा यांनी तिला चित्रपटसृष्टीत लॉन्च केले होते. यानंतर प्रियामणिने कधीच मागे वळून बघितले नाही.7 / 13साऊथच्या सर्वाधिक चर्चित सामूहिक बलात्कारप्रकरणी प्रियामणिने काहीसे वादग्रस्त ट्विट केले होते. भारत मुलींसाठी सुरक्षित नाही. मुलींनी देश सोडायला हवा, असे तिने लिहिले होते.8 / 13 प्रियामणिच्या या ट्विटनंतर युजर्सनी तिला चांगलेच सुनावले होते. अनेकांनी तिला देशद्रोही ठरवत आमिर खानची बहीण संबोधले होते.9 / 13शाहरूख खानचा चित्रपट ‘चेन्नई एक्सप्रेस’ यातील ‘वन टू थ्री फोर’ या गाण्यात प्रियामणिने कॅमिओ केला होता.10 / 13 मणिरत्नम यांच्या ‘रावण’ या सिनेमात ती अभिषेक बच्चनसोबत दिसली होती. 11 / 13गेल्यावर्षी ‘द फॅमिली मॅन’ या वेबसीरिजमध्ये ती दिसली. यात तिने मनोज वाजपेयीच्या पत्नीची भूमिका साकारली होती.12 / 13याशिवाय झी 5 वरच्या ‘अतीत’ या सिनेमात तिने काम केले.13 / 132017 मध्ये प्रियामणिने मुस्तफा राजसोबत लग्न केले. लवकरच ती अजय देवगणच्या ‘मैदान’ या सिनेमात ती दिसणार आहे.