Join us
Daily Top 2Weekly Top 5

नखरेल अदा अन् बोल्ड फोटोशूट, 'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्रीला ओळखलं का? मालिकांमध्येही केलंय काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2023 18:26 IST

1 / 7
'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री म्हणजे रुचिरा जाधव. या मालिकेत माया ही भूमिका साकारुन तिने प्रेक्षकांची मनं जिंकली. रुचिराचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरुन चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.
2 / 7
रुचिरा सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. अनेकदा रुचिरा तिचे हॉट फोटोशूटचे फोटो शेअर करताना दिसते. नुकतंच तिने लेटेस्ट फोटोशूटचे काही फोटो शेअर केले आहेत.
3 / 7
या फोटोंमध्ये तिने पांढऱ्या रंगाचं शर्ट आणि पँट परिधान केलं आहे. रुचिराने फोटोसाठी बोल्ड पोझही दिल्या आहेत. तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
4 / 7
फोटोमधील रुचिराच्या बोल्ड आणि हॉट अदा पाहून चाहतेही घायाळ झाले आहेत. रुचिराच्या या फोटोवर चाहत्यांनी लाइक्सचा वर्षाव करत कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.
5 / 7
गाजलेल्या मालिकेत काम केल्यानंतर रुचिरा 'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या पर्वात सहभागी झाली होती. साध्या आणि सरळ स्वभावाने रुचिराने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती.
6 / 7
रुचिराबरोबर तिचा बॉयफ्रेंड रोहित शिंदेही सहभागी झाला होता. 'बिग बॉस'च्या घरातील त्यांची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती.
7 / 7
रुचिराने मालिकांबरोबरच अनेक मराठी चित्रपटांतही काम केलं आहे. 'लकडाऊन लग्न', 'लव्ह लफडे' या मराठी चित्रपटांत ती झळकली होती.
टॅग्स :टिव्ही कलाकारमराठी अभिनेता