Join us
Daily Top 2Weekly Top 5

'माझ्या नवऱ्याची बायको' फेम गुरूनाथ उर्फ अभिजीत खांडकेकरची रिअल लाईफमधील पत्नी आहे खूप सुंदर, पहा तिचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2019 06:30 IST

1 / 7
झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'माझ्या नवऱ्याची बायको'मधील गुरूनाथ म्हणजेच अभिनेता अभिजीत खांडकेकरने रसिकांच्या मनात आपल्या अभिनय कौशल्यानं घर केलंय. अभिजीतची खऱ्या आयुष्यातील पत्नी सुखदा हीदेखील अभिनेत्री असून ती खुप सुंदर दिसते.
2 / 7
सुखदा सोशल मीडियावर सक्रीय असून ती वेस्टर्न व ट्रेडिशनल लूकमधील फोटो शेअर करत असते.
3 / 7
अभिजीतची खऱ्या आयुष्यातील पत्नी सुखदा खांडकेकरदेखील अभिनेत्री आहे. तसेच ती कथ्थक नृत्यांगणादेखील आहे.
4 / 7
अभिजीतने १ फेब्रुवारी २०१३ रोजी सुखदासोबत प्रेमविवाह केला आहे. अभिजीत व सुखदा दोघेही मुळचे नाशिकचे आहेत.
5 / 7
हीच तर प्रेमाची गंमत आहे या नाटकात सुखदाने डॉ.अमोल कोल्हेंसोबत भूमिका साकारली होती. धरा की कहानी या हिंदी मालिकेतही तिने काम केले आहे.
6 / 7
संजय लीला भन्साली यांच्या गाजलेल्या बाजीराव मस्तानी या सिनेमातही सुखदाने काम केले आहे. बाजीरावांची बहिण अनुबाईंची भूमिका सुखदाने साकारली होती.
7 / 7
सुखदाचा युट्यूबवरील अनसेन्सॉर्ड हा चॅट शोसुद्धा प्रसिद्ध आहे. सुखदाने गुरूकूल, उमराव असे अनेक चित्रपटातून आपल्या अभिनयाची चुणूक दाखविली आहे.
टॅग्स :अभिजीत खांडकेकरमाझ्या नवऱ्याची बायकोसुखदा खांडकेकर