By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 15:16 IST
1 / 8शिवानी-अजिंक्य ३१ जानेवारी २०१४ या दिवशी लग्नबंधनात अडकले आणि त्यांनी आपल्या आयुष्याच्या नव्या पर्वाला सुरूवात केली.2 / 8'तू जीवाला गुंतवावे' या मालिकेमुळे अजिंक्य आणि शिवानीची पहिली भेट झाली होती. 3 / 8त्यानंतर दोघांमध्ये भेटीगाठी वाढू लागल्या.4 / 8कालांतराने या दोघांमध्ये घट्ट मैत्री होऊन पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.5 / 8दरम्यान, सोशल मीडियावर शिवानी आणि अजिंक्य दोघेही प्रचंड सक्रिय असतात. आपल्या आयुष्यातील प्रत्येक अपडेट ते चाहत्यांसोबबत शेअर करत असतात.6 / 8त्याचबरोबर सोशल मीडियावर एकमेकांवरील प्रेम व्यक्त करण्याची कोणतीही संधी ते सोडत नाही.7 / 8नुकतेच शिवानी सुर्वेने सोशल मीडियावर तिचा पती अजिंक्यसोबतचे काही खास फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये शिवानी-अजिंक्यची जोडी फारच सुंदर दिसते आहे. 8 / 8'Mr.& Mrs. Nanaware',असं कॅप्शन अभिनेत्रीने या फोटोंना दिलं आहे.