तेजस्विनी पंडितनं शेअर केले नवे PHOTOS, म्हणाली "आयुष्य गाडीतच चाललं आहे"
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 15:38 IST
1 / 10 मराठी चित्रपटसृष्टीमधील आघाडीची अभिनेत्री म्हणून अभिनेत्री तेजस्विनी पंडितला (Tejaswini Pandit) ओळखले जाते. 2 / 10तेजस्विनी सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर ती व्हिडीओ आणि फोटो पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. 3 / 10आताही तिनं काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले (Tejaswini Pandit Shared Latest Beautiful Photos) आहेत. या फोटोंमध्ये ती गाडीमध्ये बसलेली दिसतेय. 4 / 10फोटोंना दिलेल्या कॅप्शनमध्ये तिनं लिहलं, मराठीतलं तुमचं आवडतं गाणं कोणतं ?? माझी तुमची आवड जुळली तर पुढच्या पोस्ट ला तुम्ही सुचवलेलं गाणं. ह्या निमित्ताने तरी तुमच्याशी संभाषण होईल नाही का ? ता.क कार selfies वाढलेत. आयुष्य गाडीतच चाललं आहे असं वाटतंय'. या पोस्टवर चाहत्यांनी त्यांना आडणारे गाण्याबद्दल सांगितलं. तर अनेकांनी तेजस्विनीच्या सौंदर्याचं कौतुक केलं आहे. 5 / 10तेजस्विनीने राखाडी रंगाचा कुर्ता परिधान केला आहे. तर त्यावर तिनं ऑक्सीडाइज्ड नथ घातलेली दिसतेय. यामुळे तिच्या सौंदर्यात आणखी भर पडली आहे.6 / 10गाडीमध्येच तिनं वेगवेगेळ्या पोझ देत फोटो काढले आहेत. तिचे हा लूक चाहत्यांना आवडला आहे.7 / 10अभिनेत्री असण्याबरोबरच तेजस्विनी एक निर्माती आणि उद्योजिकादेखील आहे. मराठीबरोबरच तिने बॉलिवूड आणि साऊथमध्येही काम केलं आहे. 8 / 10'आदिपुरुष' या हिंदी सिनेमात ती झळकली होती. तर 'अहो विक्रमार्का' या सिनेमातून तिने साऊथमध्ये पदार्पण केलं. 9 / 10कामाबद्दल बोलायचं झालं तर, अभिनेत्री तेजस्विनी पंडित बरेच दिवस मोठ्या पडद्यावर दिसलेली नाहीये. 10 / 10सध्या ती निर्मितीत जास्त सक्रिय आहे. त्यामुळे मोठ्या पडद्यावर केव्हा दिसणार असा प्रश्न तिला विचारला जात आहे.