By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 13:36 IST
1 / 102 / 10 त्यांच्या लग्नाला कलाविश्वातील सेलिब्रिटी आणि राजकीय नेत्यांनीही हजेरी लावली होती. तेजस्विनी आणि समाधान यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले. आता तेजस्विनीने लग्नाचे फोटो शेअर करत पती समाधान सरवणकर यांच्यासाठी खास पोस्ट लिहली आहे. 3 / 10तेजस्विनी लोणारीने आपल्या खास पोस्टची सुरुवात 'द्वे जीवयुग्मे हृदयं हृदयं समाहितम्। सर्वे समागता: प्रेमे नित्यम् अनुगच्छन्ति' या संस्कृत श्लोकाने केली. या श्लोकाचा आशय असा की, दोन जीवांच्या जोड्या एकमेकांच्या हृदयात सामावलेल्या असतात. प्रेम, समरसता आणि समर्पणातून ते सदैव एकत्र चालत राहतात'.4 / 10तेजस्विनीनं लिहलं. 'दत्त जयंतीच्या पवित्र दिवशी आणि पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर आम्हाला एकत्र प्रवासाला सुरुवात करण्याचे भाग्य लाभले'.5 / 10पढे तिनं लिहलं, 'हा दिवस दैवी कृपेने, आशीर्वादांनी आणि आमच्या कुटुंबीय, मित्रांच्या प्रेमाने परिपूर्ण होता. प्रत्येक क्षण पवित्र आणि आनंदाने भरलेला वाटत होता'.6 / 10 पुढे पतीला उद्देशून तिनं लिहलं, समाधान तुझ्यासोबत मला माझं हृदय, माझं घर आणि माझं सर्वस्व’ मिळालं आहे. आता आपण दोघेही एकत्र स्वप्नं, हास्य आणि अंतहीन प्रेमाने भरलेल्या आयुष्याच्या प्रवासाला सुरुवात करत आहोत'.7 / 10तेजस्विनीच्या या पोस्टवर चाहत्यांनी भरभरुन प्रेमाचा वर्षाव केलाय. तसेच त्यांना नवीन आयुष्यासाठी खास शुभेच्छाही दिल्या आहेत. 8 / 109 / 10 तेजस्विनी आणि समाधान यांनी काही महिन्यांपूर्वीच साखरपुडा करत चाहत्यांना सुखद धक्का दिला होता.10 / 10तेजस्विनीने अनेक मालिका आणि सिनेमांमध्येही काम केलं आहे. मराठी कलाविश्वातील ती लोकप्रिय चेहरा आहे. तेजस्विनीला 'बिग बॉस मराठी'मुळे प्रसिद्धी मिळाली. एक अभिनेत्री असण्यासोबतच ती निर्मातदेखील आहे.