By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2026 11:46 IST
1 / 9स्वानंदीच्या नवऱ्याचं नाव विक्रांत रामदास बदरखे आहे. कोकणातच पारंपरिक थाटात अक्षय तृतीयेच्या मुहुर्तावर तिने लग्नगाठ बांधली. आता तिने लग्नाचे आणखी काही फोटो पोस्ट केले आहेत. 2 / 9'ऐका ना...' असं म्हणत आपल्या गोड आवाजाने आणि सुंदर शब्दांनी निसर्गरम्य कोकणाची सैर घडवणारी स्वानंदी सरदेसाई काही दिवसांपूर्वीच लग्नबंधनात अडकली. 3 / 9लग्नात मंगळसूत्र घालतानाचा गोड क्षण कॅमेऱ्यात कैद करण्यात आला आहे. स्वानंदी आणि विक्रांतच्या चेहऱ्यावर गोड हसू आहे.4 / 9तर दुसऱ्या फोटोत दोघंही पूजेस बसले आहेत आणि अग्नीला नमस्कार करत आहेत. अग्नीला साक्ष मानून या जोडप्याने एकमेकांना सात जन्म साथ देण्याचे वचन दिले.5 / 9स्वानंदी म्हणजे कोकणची परीच आहे. कोकणात पारंपरिक थाटातच तिने लग्नही केलं आहे. कौलारू घर, दाराला फुलांची सजावट आणि केळीच्या पानांची खुंटे असा एकंदर थाट दिसत आहे. लग्नानंतरचा त्यांचा हा फोटो खूपच सुंदर आला आहे6 / 9तर दुसऱ्या फोटोत स्वानंदी आणि विक्रांतने मस्त पोज दिली आहे. हिरव्या नऊवारीत स्वानंदीचं सौंदर्य खुलून आलं आहे. तर विक्रांत पांढरा कुर्ता आणि क्रीम रंगाच्या पायजम्यामध्ये हँडसम दिसतोय.7 / 9स्वानंदी-विक्रांतच्या या फोटोंचं चाहत्यांनी खूप कौतुक केलं आहे. 'लक्ष्मी नारायणाचा जोडा','भोवतालचा परिसर आणि तुम्ही दोघेजण सगळं एकमेकांना खूप शोभून दिसतं आहे' अशा अनेक कमेंट्स तिच्या फोटोंवर आल्या आहेत.8 / 9स्वानंदीचा नवरा विक्रांत नाट्यदिग्दर्शक आहे. तसंच तो शॉर्ट फिल्म्सही बनवतो. याच माध्यमात काम करताना त्याची आणि स्वानंदीची ओळख झाली.9 / 9स्वानंदी सरदेसाई उत्तम गायिका तर आहेच शिवाय ती सुंदर चित्रही काढते. तिच्या कोकणातील विविध कंटेंटमुळे ती युट्यूबवर कमालीची लोकप्रिय झाली. 'दशावतार' सिनेमातलं 'ऋतुचक्र' हे तिचं गाणं अजूनही लोकांच्या ओठांवर आहे.