By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2023 14:05 IST
1 / 6सईने काही दिवसांपूर्वीच तिचे रिलेशनशिप जाहीर केले होते. अनिश तिच्या आयुष्यातील सर्वात स्पेशल व्यक्ती असल्याचं तिने म्हणलं होतं. दोघांनी एकमेकांना वाढदिवसाला शुभेच्छा देणाऱ्या पोस्ट शेअर केल्या होत्या. यानंतर त्यांचे रिलेशनशिप जगजाहिर झाले.2 / 6सईसाठी २०२२ हे वर्ष खूपच खास होते.मिमी या बॉलिवुड चित्रपटात तिने सहाय्यक अभिनेत्रीची भूमिका साकारली ज्याचे खूप कौतुक झाले. इतकंच नाही तर तिला फिल्मफेअर अवॉर्डनेही सम्मानित करण्यात आले.२०२२ या वर्षाचे तिने आभार मानले आहेत.3 / 6आता २०२३ या नवीन वर्षाचं स्वागत तिने मित्रपरिवारासोबत केले. यावेळी तिचा बॉयफ्रेंड अनिश जोगही सोबत होता. त्याच्यासोबतचे आनंदाचे क्षण तिने शेअर केले आहेत. 4 / 6एका फोटोमध्ये अनिश तिची सेवा करताना दिसतोय, तर दोघांचा व्हॅकेशनला जातानाचा पाठमोरा फोटोही तिने शेअर केला आहे. नवीन वर्षात सूर्यप्रकाशात हसतानाचा सईचा फोटो खूप सुंदर दिसत आहे. एका फोटोत दोघे योगा करताना दिसत आहेत.5 / 6सईची नुकतीच इंडिया लॉकडाऊन ही वेब सिरीज प्रदर्शित झाली. सध्या ही सिरीज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. मराठी आणि हिंदी अशा दोन्ही माध्यमांत सध्या सईचाच डंका आहे.6 / 6तर अनिश जोग हा सिनेनिर्माता आहे.'आणि काय हवं?', 'गर्लफ्रेंड', 'मुरांबा', 'वायझेड', 'डबल सीट', 'टाईम प्लीज' आणि 'धुरळा' या काही चित्रपट आणि वेबसीरिजची निर्मिती केली आहे.