'प्रेमाची गोष्ट २' फेम अभिनेत्रीच्या नवऱ्याला पाहिलंय का? अशी आहे ऋचा वैद्यची 'लव्हस्टोरी'
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 16:22 IST
1 / 10मराठीतील सुंदर अभिनेत्री म्हणून ऋचा वैद्य सध्या प्रसिद्धीझोतात आली आहे. गेल्या वर्षी ती आदिनाथ कोठारेसोबत 'पाणी' सिनेमात दिसली. तेव्हाच तिने लक्ष वेधून घेतलं होतं.2 / 10तर आता ऋचाचा 'प्रेमाची गोष्ट २' सिनेमा रिलीज झाला आहे. या सिनेमात ती ललित प्रभाकरसोबत रोमान्स करताना दिसत आहे. 3 / 10सिनेमाच्या प्रमोशननिमित्ताने ती पांढऱ्या नेट साडीत सुंदर दिसत आहे. त्यावर तिने डिझायनर ब्लाऊज घातला आहे. 4 / 10ऋचाच्या सौंदर्यावर सर्वांच्याच नजरा खिळल्या आहेत. या आऊटफिटमध्ये तिने एकापेक्षा एक सुंदर पोज दिल्या आहेत.5 / 10ऋचा वैद्य याचवर्षी लग्नबंधनात अडकली. खऱ्या आयुष्यातला तिचा प्रिन्स चार्मिंग कोण आहे माहितीये का? तर त्याचं नाव यश किरकिरे आहे. 6 / 10नुकतंच एका मुलाखतीत ऋचा तिची लव्हस्टोरी थोडक्यात सांगितली. ती म्हणाली, 'आम्ही एकमेकांना २० वर्षांपासून ओळखतो. आमची घरं समोरासमोरच होती. पण आमच्यात कधी बोलणं व्हायचं नाही.'7 / 10'आमचे बरेच कॉमन फ्रेंड्सही होते. आम्ही एकाच कॉलेजमध्येही होतो. मग मागच्या वर्षी आम्ही भेटलो. प्रेमात पडलो आणि थेट लग्नच केलं.'8 / 10नवऱ्यासोबतच्या नात्यावर ऋचा म्हणाली, 'मी माझ्या बेस्ट फ्रेंडसोबतच लग्न केलं आहे. हा अनुभव खरंच खूप सुखद आहे. आयुष्याच्या प्रवासात तुमचा मित्र तुमच्यासोबत असतो.'9 / 10'आमचं कोऑर्डिशेन खूप परफेक्ट आहे. न बोलताच त्याला माझ्या गोष्टी बऱ्याचदा कळतात. ते ट्युनिंग माझं माझ्या जोडीदाराबरोबर आहे.'10 / 10'खरं प्रेम तेच जे तुमच्या उणिवांसकट तुम्हाला स्वीकारतं. तुम्ही स्वत:च्याही नव्याने प्रेमात पडता. हीच त्या नात्यातली सुंदरता आहे.'