Join us

लाल साडी, हातात गुलाब! रिंकू राजगुरुने दिल्या 'व्हॅलेंटाईन डे'च्या शुभेच्छा; पाहा Photos

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 12:46 IST

1 / 8
'सैराट' सिनेमापासून आर्ची म्हणजेच अभिनेत्री रिंकू राजगुरु (Rinku Rajguru) चाहत्यांच्या हृदयात आहे. सिनेमात दिसलेली ती अल्लड वयातली रिंकू आता मोठी झाली आहे.
2 / 8
आज व्हॅलेंटाईन डे निमित्ताने रिंकुने सुंदर फोटो शेअर केले आहेत. साडीत ती नेहमी गोडच दिसते. आजच्या खास दिवशीही त्याने लाल साडीत फोटो पोस्ट केलेत.
3 / 8
फिकट लाल रंगाची साडी, लाल ब्लाऊज, हातात लाल बांगड्या आणि मोकळे केस असा तिचा लूक आहे. या लूकमध्ये तिने तितक्याच किलर पोज दिल्या आहेत.
4 / 8
तिच्या हातातील गुलाबानेही तिच्या सौंदर्यात भर टाकली आहे. तसंच तिची गोड स्माईल तर घायाळ करणारीच आहे.
5 / 8
आज प्रेमाचा दिवस असल्याने रिंकूने खास फोटोही शेअर केला आहे. पाठमोरी उभी राहत सूर्याकडे हात उंचावत तिने हार्ट बनवलं आहे.
6 / 8
आर्चीने या पोस्टला 'सुरीली अखियों वाले' हे रोमँटिक गाणंही लावलं आहे. तसंच तिने love असं लोकेशनमध्ये टाकलं आहे. 'तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला व्हॅलेंटाईन डे च्या शुभेच्छा' असं साधंच कॅप्शन तिने लिहिलं आहे.
7 / 8
पण आर्ची नक्की कोणाच्या प्रेमात आहे हा प्रश्न राहतोच. काही दिवसांपूर्वी तिचं नाव कृष्णराज महाडिकबरोबर जोडलं गेलं होतं. कारण दोघांनी एकत्र कोल्हापूरला महालक्ष्मीचं दर्शन घेतल्याचा फोटो व्हायरल झाला होता. मात्र नंतर कृष्णराजने या चर्चांमध्ये तथ्य नसल्याचं स्पष्ट केलं होतं.
8 / 8
रिंकू आणि परश्याचंही अनेकदा नाव जोडलं गेलं आहे. इतकंच नाही तर शिव ठाकरेसोबतही तिची चर्चा झाली. पण आर्ची कोणाच्या प्रेमात हे अजून गुलदस्त्यातच आहे.
टॅग्स :रिंकू राजगुरूव्हॅलेंटाईन्स डेसोशल मीडियामराठी अभिनेता