"बायको म्हणणारा असेल तर ये, पण..." जोडीदार कसा हवा यावर रिंकू राजगुरुचं भन्नाट उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 16:02 IST
1 / 7'सैराट' फेम अभिनेत्री रिंकू राजगुरु (Rinku Rajguru) आता नवीन नवीन प्रोजेक्ट्स मध्ये दिसत आहे. कधी लव्हस्टोरी, तर कधी गंभीर विषयावरील सिनेमात दिसली. तर कधी 'झिम्मा'सारख्या सिनेमात तिने कॉमेडीही केली.2 / 7रिंकू राजगुरुचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. तिच्या फोटोंवर दररोज हजारो कमेंट्स हमखास येत असतात.3 / 7सैराट मध्ये रिंकू आणि आकाश ठोसरची जोडी खूप गाजली. दोघं खऱ्या आयुष्यातही एकमेकांना डेट करत असल्याची अनेकदा चर्चा होते. मात्र रिंकूने कायम या चर्चांना नकार दिला आहे.4 / 7आता नुकतंच रिंकूला'बेटर हाफ' कसा असावा, तिची अपेक्षा काय असा प्रश्न विचारला गेला. यावर तिने दिलेलं उत्तर चर्चेत आहे.5 / 7नवशक्तीला दिलेल्या मुलाखतीत रिंकू म्हणाली, 'बेटर हाफ कसा पाहिजे असा मी काही विचार केला नाही. बघितल्याच क्षणी वाटलं पाहिजे की हाच तो! सगळ्या मुलींना जे हवं असतं तेच की तो आदर देणारा आणि काळजी घेणारा असावा. गृहित धरणारा नसावा.'6 / 7'आजकाल वेगवेगळ्या संकल्पना आल्या आहेत. रिलेशनशिप, सिच्युएनशिप... तर माझं असं आहे की बायको म्हणणारा असेल तर ये..गर्लफ्रेंड म्हणणारा असेल तर आपल्याला नको. आजकाल जे चालू आहे ते पाहून तर असंच वाटतं.'7 / 7रिंकू खरंतर जेन झी आहे. म्हणजेच नव्या पिढीची आहे. मात्र तिचे विचार स्पष्ट आहेत. त्यामुळे ती विचारपूर्वकच जोडीदार निवडेल असंच तिच्याकडे पाहून वाटतं.