Join us
Daily Top 2Weekly Top 5

हार्ट अटॅक, कॅन्सर अन् आत्महत्या; २०२५ मध्ये 'या' मराठी कलाकारांच्या एक्झिटने चाहत्यांना बसला जबर धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 16:07 IST

1 / 9
२०२५ हे वर्ष अनेक कारणांमुळे चर्चेत राहिलं. या वर्षात काही कलाकारांनी जगाचा निरोप घेतला. काही मराठी कलाकारांच्या मृत्यूच्या बातमीने चाहत्यांना जबर धक्का बसला होता.
2 / 9
मराठी अभिनेत्री प्रिया मराठे हिच्या निधनाची बातमी चाहत्यांना चटका लावणारी होती. प्रियाचं कर्करोगाने ३१ ऑगस्ट २०२५ रोजी निधन झालं. ती फक्त ३८ वर्षांची होती.
3 / 9
'ठरलं तर मग' मालिकेत पूर्णा आजीची भूमिका साकारणाऱ्या ज्योती चांदेकर यांनी अचानक घेतलेल्या एक्झिटने चाहते हळहळले. १६ ऑगस्ट २०२५ रोजी वयाच्या ६८व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
4 / 9
मराठी अभिनेता तुषार घाडीगावकर याच्या आत्महत्येची बातमी धक्का देणारी होती. वयाच्या अवघ्या ३४व्या वर्षी तुषारने नैराश्यातून गोरेगाव येथील राहत्या घरी २२ जूनला आत्महत्या केली.
5 / 9
अभिनेता सचिन चांदवडे यानेदेखील वयाच्या २५व्या वर्षी गावच्या घरी गळफास घेत जीवन संपवलं. नवा सिनेमा रिलीज होण्याआधी काही दिवस आधीच त्याने हे धक्कादायक पाऊल उचललं.
6 / 9
ज्येष्ठ अभिनेते डॉ. विलास उजवणे यांचं दीर्घ आजाराने वयाच्या ६२ व्या वर्षी ४ एप्रिल २०२५ रोजी निधन झालं. अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये ते दिसले होते.
7 / 9
ज्येष्ठ अभिनेते बाळकृष्ण कर्वे यांनी २८ ऑगस्ट २०२५ रोजी अखेरचा श्वास घेतला. ते ९५ वर्षांचे होते. चिमणराव गुंड्याभाऊ या मालिकेतील त्यांची भूमिका गाजली होती.
8 / 9
अभिनेत्री दया डोंगरे यांचं वयाच्या ८५व्या वर्षी वृद्धापकाळाने ३ नोव्हेंबर २०२५ रोजी निधन झालं.
9 / 9
अलार्म काका म्हणून प्रसिद्धी मिळवलेले ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार यांनी १८ ऑगस्ट २०२५ रोजी निधन झालं.
टॅग्स :प्रिया मराठेटिव्ही कलाकारमराठी अभिनेता