Join us
Daily Top 2Weekly Top 5

"मी अभिनेत्री आहे हे त्याला माहितच नव्हतं", पूजा सावंतचा सिद्धेशबाबत खुलासा, म्हणाली, "माझे सिनेमे..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2023 14:28 IST

1 / 10
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री पूजा सावंतने काही दिवसांपूर्वीच प्रेमाची कबुली देत मिस्ट्री मॅनचं गुपित उघडलं. होणाऱ्या नवऱ्याबरोबरचे फोटो पोस्ट करत पूजाने गुपचूप साखरपुडा उरकल्याचंही सांगितलं होतं.
2 / 10
पूजाने साखरपुड्याची बातमी शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला. त्यानंतर आता पहिल्यांदाच तिने होणारा नवरा सिद्धेशबाबत 'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं.
3 / 10
या मुलाखतीत पूजाने अरेंज मॅरेज पद्धतीने पहिल्यांदा सिद्धेशला भेटल्याचं उघड केलं. त्याबरोबरच सिद्धेशला मी अभिनेत्री असल्याचं माहीत नव्हतं, असा खुलासाही तिने केला.
4 / 10
पूजा म्हणाली, 'आम्ही अरेंज मॅरेज पद्धतीने भेटलो होतो. त्याचं मला स्थळ आलं होतं. माझ्या आईच्या मैत्रिणीने त्याचं स्थळ आणलं होतं. फोटो पाहताच मला तो आवडला होता. मग मी त्याला पहिला फोन केला होता. त्यानंतर मग आमचं बोलणं सुरू झालं आणि मग हळूहळू आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो.'
5 / 10
'सगळ्यांना असं वाटत होतं की एवढं काय गुपित ठेवलं. पण, गुपित होतं तेच चांगलं होतं. कारण, त्यामुळे आम्हाला एकमेकांना जाणून घेण्यासाठी वेळ मिळाला. आणि तो वेळ मिळणं फार गरजेचं होतं.'
6 / 10
'जेव्हा मी सिद्धेशचा फोटो पाहिला होता, तेव्हाच माझी पहिली घंटा वाजली होती. त्यानंतर मग जेव्हा आम्ही भेटलो तेव्हा त्याला बघताच दुसरी घंटा वाजली. त्यानंतर मग आम्ही एकमेकांसोबत बराच वेळ घालवला. मग, आम्ही कुटुंबीयांना सांगितलं.'
7 / 10
'सिद्धेशला मी कोण आहे, हे माहितच नव्हतं. त्याने माझं कुठलंही गाणं किंवा सिनेमा पाहिलाच नव्हता. पूजा सावंत नावाची अभिनेत्री आहे, हेही त्याला माहीत नव्हतं.'
8 / 10
'त्याच्या आईने त्याला एका अभिनेत्रीचे स्थळ आलं आहे, असं सांगितलं होतं. त्यावर अभिनेत्रीचं स्थळ मला का आलं असेल? अशी त्याची प्रतिक्रिया होती.'
9 / 10
'कदाचित त्याने फोटो पाहिले असतील आणि मी त्याला आवडले असेन. पण, हे सगळं इतकं सहज झालं. म्हणजे मलाही वाटलं नव्हतं की माझी लव्ह स्टोरी इतकी अनपेक्षित असेल.'
10 / 10
पूजाचा होणाऱ्या नवऱ्याचं नाव सिद्धेश चव्हाण असं आहे. सिद्धेश कामानिमित्त ऑस्ट्रेलियाला असतो.
टॅग्स :पूजा सावंतसिनेमासेलिब्रिटी