Join us

नॉनव्हेज खाणारी पूजा सावंत अचानक शाकाहारी का बनली? स्वतःच सांगितलं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 14:00 IST

1 / 10
Pooja Sawant Quit Nonveg : मराठमोळी अभिनेत्री (Marathi Actress) पूजा सावंत (Pooja Sawant) म्हणजे, लाखो चाहत्यांच्या गळ्यातील ताईत. पूजा सावंत आपल्या क्लासी अंदाजासाठी ओळखली जाते.
2 / 10
पूजा सावंत मूळची कोकणातील आहे. कोकण हा प्रदेश त्याच्या संपन्न नैसर्गिक संसाधनांसाठी, समुद्र किनाऱ्यांसाठी आणि मासांहार संस्कृतीसाठी ओळखला जातो. मासांहार केवळ आहाराचा भाग नाही तर कोकणी जीवनशैली आणि संस्कृतीशी जोडलेला आहे. पण, पूजा 'कोकणी असूनही ती मांसाहार करत नाही' हे ऐकून अनेकांना आश्चर्य वाटतं.
3 / 10
पूजा सुरुवातीला मांसाहार करत होती, पण नंतर ती पूर्णपणे शाकाहारी झाली. कट्टर मांसाहारी असलेली पूजा ही शुद्ध शाकाहारी होण्यामागे एक खास कारण आहे, जे खुद्द पूजानेच सांगितले आहे.
4 / 10
पूजा सावंतची एक जुनी मुलाखत सध्या व्हायरल होत असून तिने त्यामध्ये नॉनव्हेज का सोडलं या मागचं कारण सांगितले.
5 / 10
एका मुलाखतीत पूजाने सांगितले की, ती 'जंगली' सिनेमाचे शूट करेपर्यंत कट्टर नॉनव्हेजिटेरियन होती. पण त्यानंतर तिने मांसाहार पूर्णपणे सोडला. यामागील कारण सांगताना ती म्हणाली, 'मला प्राण्यांसाठी खूप काही करायचं होतं. माझ्या मनात बरीच वर्ष एक प्रकारचं गिल्ट होतं की, एकीकडे मी प्राण्यांना वाचवते आणि दुसरीकडे त्यांनाच मारून खाते'.
6 / 10
पूजाने सांगितले की, तिच्यासाठी अचानक मांसाहार सोडणे थोडे त्रासदायक होते, कारण लहानपणापासून मासे खाण्याची तिला सवय होती. पण शाकाहारी झाल्यावर तिला समजले की व्हेज मध्येही बऱ्याच गोष्टी खाण्यासारख्या आहेत.
7 / 10
पूजा म्हणते, 'लोक म्हणतात की, तू एकट्याने नॉनव्हेज बंद करून काय होणार? पण मला वाटतं की कुठेतरी आपण स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे. तेच मी केलं'.
8 / 10
पूजा म्हणाली, ''जंगली' सिनेमाच्या शूटदरम्यान मी हत्तींसोबत राहिले, निसर्गाच्या खूप जवळ गेले होते. तिथे जाणवलं की मोठी गाडी, घर, एसी यांसारख्या गोष्टी महत्त्वाच्या नाहीत, तर ज्या निसर्गात आपण राहतो, तेच जर आपल्या हातातून निसटत गेलं तर बाकी गोष्टींना अर्थ नाही. तर निर्सगाला जपलं पाहिजे'.
9 / 10
पूजाच्या या निर्णयाचा तिच्या कुटुंबावरही मोठा परिणाम झाला. ती शाकाहारी झाल्यामुळे तिच्या घरच्यांनीही आता घरात चिकन बनवणे बंद केले आहे. तिचे भाऊ-बहीणही आता मांसाहार कमी खातात.
10 / 10
याबद्दल पुजा म्हणाली, 'ते पुर्ण शाकाहारी झालेले नाहीत. पण, आता आमच्या घरात रविवारी चिकनऐवजी अळूवडी आणि पुलाव यांसारखे शाकाहारी पदार्थ बनतात'.
टॅग्स :पूजा सावंतमराठी अभिनेतासेलिब्रिटीअन्नहेल्थ टिप्स