७० वर्षांच्या झाल्या नीना कुलकर्णी, अजूनही दिसतात तितक्याच सुंदर, खास पद्धतीने सेलिब्रेट केला बर्थडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 11:23 IST
1 / 10नीना कुलकर्णी या दिग्गज अभिनेत्री आहेत. गेली कित्येक दशकं त्या नाटक, सिनेमा आणि मालिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. 2 / 10अभिनयाने नीना कुलकर्णींनी एक काळ गाजवला. आज ७० वर्षांच्या असूनही नीना कुलकर्णी प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन करत आहेत. 3 / 10नीना कुलकर्णींचा नुकताच वाढदिवस झाला. त्यांनी आता वयाची सत्तरी गाठली आहे. 4 / 10कुटुंबीय आणि मित्र मैत्रिणींनी नीना कुलकर्णींचा वाढदिवस खास पद्धतीने सेलिब्रेट केला. याचे फोटो त्यांनी शेअर केले आहेत. 5 / 10दिव्यांनी नीना कुलकर्णींचं औक्षण करण्यात आलं. हे सगळं पाहून नीना कुलकर्णी भारावून गेल्या. 6 / 10वयाची सत्तरी गाठली तरी नीना कुलकर्णी आजही तितक्याच सुंदर दिसतात. त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज थोडंही कमी झालेलं नाही. 7 / 10नीना कुलकर्णींनी नाटकातून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं. त्यानंतर अनेक मराठी सिनेमांमध्ये त्या झळकल्या. 8 / 10सवत माझी लाडकी', 'हाच सुनबाईचा भाऊ', 'वेड लावी जीवा', 'फोटोप्रेम', 'दागिना', 'संगीत मानपमान', 'गोदावरी', 'बायोस्कोप', 'घायाळ' हे त्यांचे गाजलेले मराठी चित्रपट. मराठी सोबतच त्यांनी हिंदी सिनेसृष्टीही गाजवली. 9 / 10'मिर्च मसाला', 'दायरा', 'बादल', 'ढाई अक्षर प्रेम के', 'नायक', 'फिर भी दिले है हिंदुस्तानी', 'मेरे यार की शादी', 'हंगामा', 'दम' अशा सुपरहिट हिंदी सिनेमांत त्यांनी काम केलं आहे. 10 / 10सध्या नीना कुलकर्णी 'येड लागलं प्रेमाचं' मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत.