By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 13:31 IST
1 / 8 मराठी चित्रपटांची आवड असणाऱ्या प्रत्येक सिनेरसिकाला माहिती असलेले नाव म्हणजे अभिनेत्री रेखा राव. त्यांनी साकारलेल्या भूमिका आणि आजही सिनेरसिकांच्या फेव्हरेट लिस्टमध्ये वरच्या क्रमांकावर आहेत. 2 / 8 अभिनेत्री रेखा राव मराठीसह हिंदी सिनेमा आणि मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनावर आपल्या अभिनयाची छाप उमटली.'धरलं तर चावतंय', 'प्रेम करूया खुल्लमखुल्ला', 'शुभ मंगल सावधान', 'आमच्यासारखे आम्हीच' हे गाजलेले चित्रपट त्यांच्या नावावर आहेत. 3 / 8 त्याकाळात आघाडीच्या अभिनेत्रींचा दबदबा असतानाही रेखा राव यांनी आपल्या अभिनय कौशल्याने आपले वेगळे स्थान निर्माण केलं होतं. 4 / 8 रेखा यांना अगदी बालपणापासून नृत्याची आवड होती. किशोर कुमार यांच्या समोर परफॉर्म करायला संधी त्यांना मिळाली होती. 5 / 8 अभिनेत्री रेखा राव या मूळच्या बँगलोरच्या. त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतून आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यांचा पहिला चित्रपट होता 'नाम बडे'. 6 / 8 मराठीमध्ये अभिनेते अशोक सराफ यांच्यासोबत त्यांची जोडी हिट ठरली. तसेच 'हम दिल दे चुके सनम', 'तेहजीब' 'हिरोज' यांसारख्या सिनेमांमध्ये त्या झळकल्या होत्या. 7 / 8 गेल्या अनेक वर्षांपासून रेखा राव मराठी तसेच हिंदी सृष्टीपासून दूर आहेत. सध्या त्या दाक्षिणात्य सिनेसृष्टीत तसेच मालिकेत त्या काम करत आहेत.8 / 8बँगलोरमध्येच त्या आपल्या कुटुंबासोबत राहतात. रेखा राव यांचा आजही प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. पूर्वीप्रमाणे आजही त्या तितक्याच सुंदर दिसतात.