घारे डोळे अन् आरस्पानी सौंदर्य! अशोक सराफ यांच्यासोबत झळकलेली 'ही' अभिनेत्री आता काय करते?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2025 18:46 IST
1 / 7अभिनयाच्या चंदेरी दुनियेत काम करणाऱ्या अभिनेत्यांशी तुलना करता अभिनेत्रींचं करिअर फार लवकर संपतं असं म्हटलं जातं. लग्न झालं की संसार आणि मुलं झाली की अनेक अभिनेत्री करिअर सोडून संसारात व्यस्त होतात. 2 / 7मराठी सिनेसृष्टीतील अशीच एक अभिनेत्री जिने आपल्या सहज सुंदर अभिनयाने चाहत्यांच्या मनावर वेगळीच छाप उमटवली. या अभिनेत्रीने मराठी सिनेसृष्टीचा एक काळ गाजवला. पण आज ही अभिनेत्री चित्रपटसृष्टीपासून दूर कोणत्या झगमगटाविना आयुष्य जगत आहेत. 3 / 7दिग्गज कलाकारांसोबत झळकलेल्या या अभिनेत्रीने आपल्या अभिनयानेच नाहीतर सौंदर्यांनेही रसिकांची पसंती मिळवली ती अभिनेत्री आहे रेखा राव. 4 / 7रेखा राव यांनी फक्त मराठीच नव्हे तर हिंदी सिनेमा आणि मालिकांमध्येही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. 'धरलं तर चावतंय', 'प्रेम करूया खुल्लमखुल्ला', 'शुभ मंगल सावधान', 'आमच्यासारखे आम्हीच' यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं आहे. 5 / 7याशिवाय त्या 'हम दिल दे चुके सनम', 'तेहजीब' , 'हिरोज' यांसारख्या सिनेमांमध्ये त्या झळकल्या. त्याकाळात रेखा राव यांनी आपल्या अभिनयकौशल्याने इंडस्ट्रीत आपलं वेगळं स्थान निर्माण केलं.6 / 7रेखा राव या मुळच्या बंगळुरू येथील आहेत. अगदी बालपणापासूनच त्यांना नृत्याची आवड होती. त्यामुळे त्यांनी शास्त्रीय नृत्याचं प्रशिक्षण सुद्धा घेतलं. ‘अथेगे थक्क सोसे’ या कन्नड चित्रपटातून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. 7 / 7सध्या बँगलोरमध्येच त्या आपल्या कुटुंबासोबत राहतात. रेखा राव यांचा आजही प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे.पूर्वीप्रमाणे आजही त्या तितक्याच सुंदर दिसतात. आजही रेखा राव यांची जादू कायम आहे. तिथे त्यांनी 'अम्माज किचन' नावाने खानावळ सुरू केली होती.