Join us
Daily Top 2Weekly Top 5

'देवदास'मध्ये झळकलेल्या 'या' मराठी अभिनेत्रीला ओळखलं का? सौंदर्य अन् अभिनयात बॉलिवूड अभिनेत्रींना देते टक्कर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2026 14:29 IST

1 / 7
हिंदी सिनेसृष्टीत आजवर अनेक सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत.मात्र, त्यातील काही सिनेमांनी प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं. या सिनेमांची जादू अजूनही ओसरली नाही.
2 / 7
यापैकीच एक नाव म्हणजे 'देवदास'.संजय लीला भन्साळी दिग्दर्शित हा सिनेमा २००२ साली प्रदर्शित झाला होता.'देवदास' चित्रपटाचे आजही लाखो चाहते आहेत.
3 / 7
आजही या चित्रपटातील गाणीसुद्धा आवर्जून ऐकली जातात. देवदास चित्रपटामध्ये शाहरुखने साकारलेला देवदास तसेच ऐश्वर्याने साकारलेली पारो आणि माधुरीच्या चंद्रमुखीची भूमिका प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. मात्र, तुम्हाला माहितीये का या चित्रपटात मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री नेहा पेंडसे देखील झळकली होती.
4 / 7
'देवदास' चित्रपटामध्ये नेहाने चौरंगी नावाचं पात्र साकारलं होतं. या चित्रपटात तिने शाहरुख आणि माधुरीसोबत एकत्र स्क्रिन शेअर केली होती.
5 / 7
नुकत्याच 'आरपार'ला दिलेल्या मुलाखतीत तिने या चित्रपटात काम करण्याचा अनुभव शेअर केला. नेहाने आपल्या करिअरची सुरुवात बालकलाकार म्हणून केली होती.
6 / 7
नेहा पेंडसेने मराठीसह हिंदी चित्रपट, मालिका आणि दाक्षिणात्य सिनेविश्वातही नाव कमावलं आहे. सध्याच्या घडीला नेहाची गणना मराठी सिनेइंडस्ट्रीतील आघाडींच्या नायिकांमध्ये केली जाते. सौंदर्य आणि अभिनयाच्या बाबतीत बॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर देते.
7 / 7
नेहाने १९९० साली 'हसरतें' मधून डेब्यू केला होता. याशिवाय नेहाने आतापर्यत अनेक मराठी चित्रपट, मालिका तसेच 'दाग: द फायर','दीवाने', 'तुमसे अच्छा कौन है', 'देवदास', 'ड्रीम्स', 'स्वामी', 'असीमा', 'दिल तो बच्चा है जी'यांसारख्या मालिका चित्रपटांमध्ये काम केलं
टॅग्स :नेहा पेंडसेमराठी अभिनेतासेलिब्रिटीबॉलिवूडसिनेमा