By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 12:07 IST
1 / 7 २०१४ साली आलेला 'फॅण्ड्री' हा चित्रपट चांगलाच चर्चेत आला होता. या चित्रपटातून अभिनेत्री राजेश्वरी खरातला प्रचंड लोकप्रियता मिळाली. नागराज मंजुळे दिग्दर्शित या चित्रपटातून ती महाराष्ट्रीतील घराघरात पोहोचली. 2 / 7 'फॅण्ड्री' प्रदर्शित होऊन आता साधारण १२ वर्ष उलटली आहेत. मात्र, आजही चित्रपटातील जब्या आणि शालूची भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात आहे. आजही लोक तिला शालू म्हणूनच ओळखतात. 3 / 7 'फॅण्ड्री' चित्रपटात राजेश्वरी अगदी साध्या अंदाजात दिसली होती. पण रिअल लाईफमध्ये ती खूपच ग्लॅमरस आहे.4 / 7 मराठमोळी अभिनेत्री राजेश्वरी खरात सोशल मीडियाव कमालीची सक्रिय असते.5 / 7 सोशल मीडियावर तिला लाखो लोक फॉलो करतात.6 / 7 नुकतेच तिने इन्स्टाग्राम अकाउंटवर खास फोटो शेअर केले आहेत. सोनेरी रंगाचा ड्रेस परिधान करून हटके अंदाजातील तिने हे फोटो क्लिक केले आहेत. 7 / 7 राजेश्वरी खरात या फोटोंमध्ये कमालीची सुंदर दिसत असून तिचे हे फोटो नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरले आहेत.