Join us
Daily Top 2Weekly Top 5

घारे बोलके डोळे अन् गोड चेहरा! ९० चे दशक गाजवणाऱ्या अर्चना जोगळेकर दिसतात अशा, ओळखणंही झालं कठीण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 16:15 IST

1 / 8
९० चे दशक आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने गाजविणाऱ्या मराठी अभिनेत्रींपैकी एक नाव म्हणजे अभिनेत्री अर्चना जोगळेकर.एक उत्तम अभिनेत्री सोबतच एक कथक नृत्यांगना आणि कोरिओग्राफर म्हणून त्यांची इंडस्ट्रीत ओळख आहे.
2 / 8
घारे बोलके डोळे,गोड चेहरा आणि सहजसुंदर अभिनयाने अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या अर्चना जोगळेकरांचा जन्म १ मार्च १९६३ रोजी मराठी कुटुंबात झाला. त्यांचे वडील वडील अनंत जोगलेकर हे चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक होते तर आई आशा जोगळेकर कथ्थक विशारद होत्या.
3 / 8
अगदी बालपणापासूनच अर्चना यांनी आपल्या आईकडून कथ्थक शिकायला सुरुवात केली. मग त्यांनी कथ्थक आणि शिक्षणाचा अभ्यास दोन्ही गोष्टींचा अगदी व्यवस्थित समतोल राखला. त्यांनी गुरु कल्याणसुंदरम पिल्लई यांच्याकडून भरतनाट्यमही शिकले. अर्चना या मुंबई विद्यापीठाच्या वाणिज्य पदवीधर आणि कायद्याच्या पदवीधर (एल. एल. बी.) आहेत.
4 / 8
शिक्षण पूर्ण केल्यानंतर अर्चना यांनी कलाक्षेत्राची वाट धरली. 'उघडले स्वर्ग चे दार या मराठी नाटकात मुख्य भूमिका साकारून त्यांनी रंगभूमीवर पदार्पण केलं. या भूमिकेने त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा आणि समीक्षक पुरस्कार मिळवून दिला.
5 / 8
साल १९८५ मध्ये त्यांनी खिचडी या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं. पुढे अर्चना यांनी 'रंगत संगत ,' निवडुंग', 'एकापेक्षा एक'आणि' अपेक्षा' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं.'सुना चोढई' (१९८८) या ओडिया चित्रपटातून कारकीर्द सुरू करणाऱ्या अर्चना ‘पान पसंद’च्या जाहिरातीमध्येही झळकल्या होत्या. इथूनच त्यांची खरी ओळख निर्माण झाली. या जाहिरातीमध्ये त्यांनी साकारलेली खट्याळ गोड मुलगी सर्वानाच आवडली.यानंतर त्यांनी दूरदर्शनवरील ‘चुनौती’ या मालिकेमधून त्या घराघरात लोकप्रिय झाल्या. अर्चना यांनी आपल्या अभिनय कारकीर्दीत मराठी, हिंदी आणि ओडिसा भाषेतील चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
6 / 8
हिंदी चित्रपटसृष्टीत आतंक ही आतंक या चित्रपटातून त्यांनी हिंदीत पदार्पण केले. दिलीप शंकर दिग्दर्शित या चित्रपटात आमीर खानही होता. गॉडफादर या गाजलेल्या कादंबरीवर बेतलेला हा चित्रपट होता. पण दुर्दैवाने चित्रपट नको तितका रखडला आणि प्रदर्शित झाल्यावर फारसं यश मिळवू शकला नाही.
7 / 8
दरम्यान, एका ओडिया चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान, अर्चना जोगळेकर यांच्यावर एका व्यक्तीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने, त्या या परिस्थितीतून बाहेर पडण्यात यशस्वी झाल्या. हल्लेखोराच्या विरोधात त्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्या व्यक्तीला अटक होवून २०१० मध्ये १८ महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. १९९९ मध्ये लग्न केल्यानंतर अर्चना जोगलेकर त्यांचे पती निर्मल मुळे यांच्यासोबत अमेरिकेत स्थायिक झाल्या; त्यांना 'ध्रुव' हा मुलगा आहे.
8 / 8
अर्चना यांनी अमेरिकेला गेल्यावर त्यांच्या आईने मुंबईमध्ये सुरू केलेल्या अर्चना नृत्यालयाची शाखा तिकडे सुरू केली. खजुराहो नृत्य महोत्सव, कोणार्क नृत्य महोत्सव, एलिफेंटा महोत्सव आणि जागतिक हिंदी परिषद यासारख्या अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांमध्येही त्यांनी सादरीकरण केले आहे. २०१२ साली ‘मॅरीड टू अमेरिका’ या हिंदी चित्रपटात त्या शेवटच्या दिसल्या होत्या. त्यानंतर त्यांनी मनोरंजनसृष्टीतील प्रवासाला कायमचा पूर्णविराम दिला.
टॅग्स :मराठी चित्रपटसेलिब्रिटीसोशल मीडियाव्हायरल फोटोज्