Join us

अर्ध्यावरती डाव मोडला! 'या' अभिनेत्रींनी लग्नानंतर काहीच वर्षात गमावले जोडीदार; एकटीनेच केला मुलांचा सांभाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2023 09:44 IST

1 / 9
मराठी मनोरंजनसृष्टीत अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी ऐन तारुण्यातच आपल्या पतीला गमावले आहे. मुलंबाळं झाल्यानंतर काही वर्षातच अभिनेत्रींच्या जोडीदाराचं निधन झालं आहे. त्या अभिनेत्रींनी एकटेच मुलांचा सांभाळ करुन त्यांना मोठं केलं आहे. आजही या अभिनेत्री काम करत असून आता त्यांच्या मुलांनीही याच क्षेत्रात नाव कमावलंय.
2 / 9
मराठी आणि हिंदी अशा दोन्ही क्षेत्रात नाव कमावणाऱ्या अभिनेत्री नीना कुलकर्णी (Neena Kulkarni). १९८० मध्ये त्यांनी अभिनेते दिलीप कुलकर्णी यांच्याशी लग्नगाठ बांधली. लग्नाआधी दोघंही सहा वर्ष एकमेकांना डेट करत होते. त्यांना सोहा आणि दिवीज ही दोन मुलं झाली.
3 / 9
मात्र मुलांच्या जन्मानंतर काही वर्षातच दिलीप कुलकर्णी यांचं हृदयविकाराने निधन झालं. आज सोहा ही टेलिव्हिजन निर्मिती क्षेत्रात काम करत आहे तर दिवीज अॅडव्हर्टायझिंग क्षेत्रात कार्यरत आहे.
4 / 9
गंगुबाई नॉनमॅट्रिक मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या प्रभावशाली अभिनेत्री निर्मिती सावंत (Nirmitee Sawant) आजही प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. त्यांचं महेश सावंत यांच्याशी लग्न झालं होतं. लग्नानंतर अभिनय या मुलाचा जन्म झाला.
5 / 9
मात्र अभिनय लहान असतानाच महेश सावंत यांचं निधन झालं. निर्मिती यांनी आपलं काम सुरु ठेवत मुलाचा सांभाळ केला. आज अभिनयही एक उत्तम अभिनेता आहे.
6 / 9
श्रीयुत गंगधार टिपरे मालिकेतून सर्वांचं लक्ष वेधून घेणाऱ्या अभिनेत्री शुभांगी गोखले (Shubhangi Gokhale). करिअरच्या सुरुवातीलाच अगदी तरुण वयातच त्या अभिनेते मोहन गोखलेंच्या प्रेमात पडल्या. उंच, गोरे आणि घारे डोळे असलेल्या मोहन गोखलेंनी शुभांगीवर प्रेमाची जादूच केली होती. १९८९ साली दोघंही लग्नबंधनात अडकले. तर चार वर्षांनी त्यांना सखी ही मुलगी झाली.
7 / 9
एका चित्रपटाच्या शूटसाठी चेन्नईत असतानाच मोहन गोखलेंना हृदयविकाराचा झटका आला आणि १९९९ साली ते हे जग सोडून गेले. शुभांगी आजही पतीच्या आठवणीत खूप भावूक होतात. मोहन यांच्या जाण्यानंतर त्यांनी सखीचे सगळे लाड पुरवले तिला मोठं केलं. आज सखी सुद्धा मराठी सिनेसृष्टीत अभिनेत्री आहे.
8 / 9
प्रेक्षकांना खळखळून हसवणारे अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या अचानक निधनाने सर्वांनाच धक्का बसला होता. चाहतेच एवढे धक्क्यात होते म्हटल्यावर त्यांची पत्नी प्रिया बेर्डेची (Priya Berde) काय अवस्था झाली असणार याचा विचारही करवत नाही. 1998 साली लक्ष्मीकांत बेर्डे आणि प्रिया यांचं लग्न झालं. दोघांना स्वानंदी आणि अभिनय ही दोन मुलं झाली.
9 / 9
मात्र लक्ष्मीकांत यांची प्रिया बेर्डेंना केवळ ६ वर्ष साथ लाभली. २००४ साली लक्ष्मीकांत बेर्डेंचा आजाराने मृत्यू झाला. यानंतर प्रिया बेर्डेंनी दोन्ही मुलांचा सांभाळ केलाच. मुलगा अभिनय बेर्डेनेही आता चित्रपटसृष्टीत पदार्पण केलंय.
टॅग्स :मराठी अभिनेतालग्न