By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2024 16:46 IST
1 / 9अभिनेत्री शिवानी सुर्वे आणि अभिनेता अजिंक्य ननावरे नुकतेच विवाहबंधनात अडकले आहेत. गुपचूप साखरपुडा केल्यानंतर आज त्यांनी लग्नगाठ बांधली. 2 / 9ठाणेमधील येऊर येथील एक्झॉटिका द ट्रॉपिकल रिट्रीट या रिसॉर्टमध्ये त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडला. 3 / 9शिवानी-अजिंक्यच्या शाही विवाहसोहळ्याला मराठी कलाविश्वातील मंडळींनीही हजेरी लावली होती. त्यांच्या लग्नसोहळ्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. 4 / 9घोड्यावर वरात घेऊन अजिंक्य विवाहसोहळ्यात आला होता तो क्षण. 5 / 9आयुष्यातील या खास क्षणासाठी शिवानी आणि अजिंक्यने शाही लूक केला होता. 6 / 9शिवानीने बदामी रंगाचा डिझायनर लेहेंगा परिधान केला होता. तर अजिंक्यने सूट परिधान करत डोक्यावर फेटा बांधला होता. 7 / 9शिवानी आणि अजिंक्यने ३१ जानेवारीला साखरपुडा केला. त्याचे फोटो शेअर करत त्यांनी चाहत्यांना आश्चर्याचा धक्काच दिला. 8 / 9त्यानंतर १ फेब्रुवारीला अजिंक्य आणि शिवानीने विवाहबंधनात अडकत त्यांच्या नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. 9 / 9मित्रपरिवार आणि कुटुंबियांच्या उपस्थितीत शिवानी आणि अजिंक्यने सात फेरे घेत लग्नगाठ बांधली आहे.