1 / 8अभिनेते अशोक सराफ, सुरेखा कुडची आणि सारिका नवाथे यांची मुख्य भूमिका असलेला 'पहिली शेर दुसरी सव्वाशेर, नवरा पावशेर' हा चित्रपट चांगलाच गाजला होता. 2 / 8२००६ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातील कलाकारांच्या कसदार अभिनयाने प्रेक्षकच नाही तर समीक्षकांचीही वाहवा मिळवली.3 / 8दोन लग्न करुन बायकांच्या नादात फसलेल्या नवऱ्याची कथा या चित्रपटात दाखवण्यात आली. दरम्यान, पहिली शेर दुसरी सव्वाशेर, नवरा पावशेर मध्ये अशोर सराफ यांनी पांडबा नावाची भूमिका साकारली होती. तर पहिली बायको कमळीच्या भूमिकेत अभिनेत्री सुरेखा कुडची दिसल्या.4 / 8शिवाय सारिका नवाथे यांनी पांडबाची दुसरी बायको म्हणजेच मालकीणची भूमिका उत्तमरित्या वठवली. या चित्रपटातील सारिका यांचं ते पात्र आजही चाहत्यांच्या लक्षात आहे. 5 / 8'पहिली शेर दुसरी सवाशेर नवरा पावशेर' चित्रपट प्रदर्शित होऊन जवळपास १८ वर्ष झाली. 6 / 8त्यातच सोशल मीडियावर सारिका नवाथे यांचे फोटो समोर आले आहेत. या फोटोंमध्ये त्यांना ओळखणं कठीण झालं आहे. सारिका नवाथे आता पूर्वीपेक्षा फारच सुंदर दिसत आहेत. 7 / 8सारिका यांनी मराठी सिनेमा, टीव्ही मालिका आणि रंगभूमीवर काम केलं आहे. अलिकडेच त्या 'ठिपक्यांची रांगोळी' मालिकेत त्या पाहायला मिळाल्या. 8 / 8तर २००८ मध्ये संदीप कुलकर्णींसह 'एक डाव संसाराचा' या सिनेमातही काम केलं.