1 / 10मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री निर्मिती सावंत यांचं नाव अत्यंत आदराने घेतलं जातं.2 / 10चित्रपट, मालिका आणि नाटक अशा विविध माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या निर्मिती सावंत यांनी प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केलं. त्यामुळे सोशल मीडियावर त्याची कायम चर्चा रंगत असते. 3 / 10कुमारी गंगुबाई नॉन मॅट्रिक, हप्ता बंद, कॉन्स्टेबल कामना कामतेकर या त्यांच्या मालिका विशेष गाजल्या. त्यामुळे सोशल मीडियावर त्या कायम चर्चेत येत असतात.4 / 10निर्मिती सावंत लवकरच किचन कल्लाकार या शोमध्ये हजेरी लावणार आहेत. त्यामुळे त्यांची चर्चा होतांना दिसते. मात्र, त्यांच्यासोबतच त्यांच्या सूनबाईंचीदेखील चर्चा रंगली आहे.5 / 10फू बाई फू, जाडूबाई जोरात या मालिकांमध्ये झळकलेल्या निर्मिती सावंत यांची सूनदेखील एक उत्तम कलाकार आहे.6 / 10निर्मिती सावंत यांच्या लेकाने अभिनय सावंतने पूर्वा पंडित हिच्यासोबत लग्न केलं आहे.7 / 10अभिनय आपल्या आईप्रमाणेच एक उत्तम अभिनेता आहे. तर, पूर्वा एक डुडल आर्टिस्ट आहे.8 / 10पूर्वा सोशल मीडियावर सक्रीय असून तिच्या प्रोफेशनल लाइफसोबतच पर्सनल लाइफमधील काही घडामोडीही चाहत्यांसोबत शेअर करत असते.9 / 10पूर्वाची स्वत:ची एक डुडल कंपनी आहे. त्यामुळे ती स्वत: तिच्या हाताने डूडल्स तयार करत असते.10 / 10पूर्वाने सासूबाई निर्मिती सावंत यांच्यासोबतही अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.